Continues below advertisement

पुणे : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन जागांसाठीची निवडणूक (Baramati Nagar Parishad Election) पुढे ढकलण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 13 ब आणि प्रभाग क्रमांक 17 अ या दोन जागा वगळून इतर सर्व ठिकाणी आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याने ते न्यायालयात गेले होते. आता न्यायालयाच्या निर्देशानुसार, या दोन जागांवरील निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने पार पडणार आहे.  

बारामती नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. त्यामध्ये बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील तेराव्या प्रभागातील ब क्रमाची जागा आणि सतराव्या प्रभागातील अ क्रमांकाची जागा, यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर, 26 नोव्हेंबर रोजी नव्याने प्रत्येकी एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी सत्र न्यायालयाने निकाल दिला होता.

Continues below advertisement

Baramati Election : न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही

न्यायालयाच्या आदेशानुसार, हे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र काही बाबी लक्षात घेता या उमेदवारी अर्जांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडन सुधारित आदेश मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या नव्याने येणाऱ्या आदेशानुसार वरील दोन जागांची निवडणूक होईल. तोपर्यंत या दोन जागा वगळून नगराध्यक्ष आणि इतर बाकीच्या सर्व जागांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे.

Baramati Election Saty : भाजपच्या पदाधिकाऱ्यांची न्यायालयात धाव

भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते. त्यांनी या संदर्भात सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नगरपरिषद निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरील नामनिर्देशन पत्र सादर करतानाचा सीसीटीव्ही फुटेज त्यांनी सादर केला होता.

न्यायालयाने सर्व बाजू पडताळून नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांचे अर्ज स्वीकारावेत अशा प्रकारचा आदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी बुधवारी नव्याने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केल आहे.

ही बातमी वाचा: