Horoscope Today 28  February 2024 Cancer Leo Virgo : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 


कर्क-   (Cancer Today Horoscope)  


नोकरी (Job) - नोकरदारांना कोणताही निर्णय घेताना आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्यावा.  तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकता.


व्यवसाय (Business) - व्यापाऱ्यांना नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याचे मार्ग शोधावे लागतील, कारण व्यवसायाचा जितका विस्तार होईल तितका तुमच्या व्यवसायात नफा होईल. व्यवसायाचा विस्तार झाल्याने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.


कुटुंब (Family)- तरुणांनी राग आल्यावर शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  कारण रागाच्या भरात केलेली एखादी गोष्ट कोणाचे मन दुखवू शकतो.   कुटुंबाच्या कामात हातभार लावा.  तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.


आरोग्य (Health)  -  उत्तम आरोग्यासाठी तुम्ही आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन केले तर तुमचे आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहते. 


सिंह (Leo Today Horoscope)


नोकरी (Job) -   कामाच्या ठिकाणी शुल्लक  मुद्द्यांवर वादविवाद होण्यची शक्यता आहे. वाद टाळण्याचा प्रयत्न करा.  वादामुळे तुमचे सहकारी नाराज होऊ शकतात. 


व्यवसाय (Business) - जर तुम्ही तुमचा माल निर्यात करत असाल तर तुम्हाला निर्यात केलेल्या मालाची खरेदी करणाऱ्या संस्थेची माहिती असली पाहिजे.  अन्यथा तुमच्या मालाच्या विक्रीत फरक पडू शकतो.


कुटुंब (Family)- आनंदी वागण्यामुळे त्यांच्या मित्रांची संख्या वाढेल.   कुटुंबातील सदस्यांचे तुमच्याशी वागणे तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, तुमचा त्यांच्याशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. 


आरोग्य (Health)  - सर्व समस्या बाजूला ठेवून तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, तरच तुमचे आरोग्य निरोगी होऊ शकते. 


कन्या (Virgo Today Horoscope)  


नोकरी (Job) -  नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर उद्या ऑफिसमध्ये उद्धटपणा वागणे टाळावे. कधी कधी इतरांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते, त्यामुळे अहंकार सोडून समोरच्याचे  ऐकण्याचा प्रयत्न करावा.


व्यवसाय (Business) - तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असेल तर आणि ती व्यक्ती पैसे परत करत नसेल, तर तुम्ही त्याला एकदा आठवण करून दिली पाहिजे.  जेणेकरून ती व्यक्ती वेळेवर पैसे परत मिळतील.


विद्यार्थी (Student) -  तुम्ही कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असाल आणि त्यासाठी मॉक टेस्ट दिली असेल तर उद्या तुम्हाला चांगले यश मिळेल.   तुमच्या आई-वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. 


आरोग्य (Health)  - जास्त काळजी केल्याने आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. घरच्या घरी औषधोपचार बंद करा.  डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे घ्या.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :