Horoscope Today 28 August 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 28 ऑगस्ट 2025, आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आज दीड दिवसांच्या बाप्पाचं देखील विसर्जन होणार आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरुंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज अति भावनाप्रधान ठेवण्यात अर्थ नाही त्यामुळे तुमचा स्वभाव मूडी बनेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज अपेक्षाभंगाचे दुःख जानवे फक्त तुमच्या स्वभावाप्रमाणे ते तुम्ही दुसऱ्यांना जाणवू देणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
पती-पत्नीमध्ये वैचारिक संघर्ष होतील कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहार करू नयेत.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज कोणाला जामीन राहू नका प्रेम प्रकरणांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
महिलांनी कशालाही भूलू नये. तुमच्या दिलदार स्वभावामुळे बराच मान मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
बेकार तरुणांना नोकरी लागण्याचा कार नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
मधुमेह असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे दगदग टाळावी.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आज तुमच्या वागण्यात एक प्रकारच्या बेधडकपणा दिसेल थोड्या थोड्या गोष्टींवरून तापटपणाही वाढवाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज फास्ट लाईफ फार आवडेल. परंतु झेपेल एवढेच काम करा.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
दुसऱ्यांना सहकार्य करण्यात पुढे राहाल घरात आणि घराबाहेर मंगल कार्य जमवण्याचा योग घडू शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
शांत आणि स्थिरचित्ताने व्यवहार कराल त्यामुळे अर्थातच उत्साही आणि आनंदी वातावरण तुमच्या आसपास राहील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
व्यवसायात बाह्य गोष्टींचा पगडा चटकन बसेल त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरून मूड घालवाल.
हेही वाचा :