Patanjali : पतंजली आयुर्वेदचे म्हणणे आहे की भारतीय एफएमसीजी (FMCG) उद्योगात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यामागे मोठा वाटा त्यांच्या टिकाऊ पॅकेजिंग धोरणाचा आहे. पर्यावरणाविषयी जबाबदारी लक्षात घेऊन कंपनीने असे पॅकेजिंग स्वीकारले आहे जे फक्त आकर्षक नाही तर पर्यावरणपूरक देखील आहे. त्यांच्या उत्पादनांसाठी 'न्यू एज डिझाईन' सादर करण्यात आले असून त्याचा उद्देश आधुनिकता आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम घडवणे हा आहे.

पॅकेजिंगमध्ये नैसर्गिक, बायोडिग्रेडेबल साहित्याचा वापर

पतंजलीच्या मते, "उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये नैसर्गिक व बायोडिग्रेडेबल साहित्याचा वापर केला जातो, जसे की कंपोस्टेबल पॅकेजिंग, कागद-आधारित साहित्य आणि बायोप्लास्टिक. या साहित्याचा वापर झाल्यानंतर ते सहजपणे विघटित होतात, ज्यामुळे पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी होतो. उदाहरणार्थ, कंपनी बांबूच्या कंटेनरचा वापर करते, जो वेगाने वाढणारा आणि टिकाऊ स्त्रोत आहे. यामुळे पर्यावरणाला फायदा होतोच, शिवाय ग्राहकांमध्ये पतंजलीची एक पर्यावरण-जागरूक ब्रँड अशी छाप पडते."

खर्च-परवडणारे धोरण

पतंजलीने सांगितले की त्यांची पॅकेजिंग रणनीती खर्च-परवडणारी आहे. त्यांनी असे साहित्य निवडले आहे जे पर्यावरणासाठी चांगले असून उत्पादन खर्चही कमी ठेवतात. यामुळे ग्रामीण आणि अर्ध-शहरी बाजारपेठेत (Semi-Urban Market) स्पर्धात्मक किमतीत उत्पादने उपलब्ध करून देता येतात. यामुळे कंपनीची पोहोच वाढते तसेच ग्राहकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक उत्पादने मिळतात.

इतर एफएमसीजी कंपन्यांसाठी प्रेरणा

पतंजलीचा दावा आहे, "आमचे मॉडेल इतर एफएमसीजी कंपन्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आज ग्राहक पर्यावरण-जागरूक होत आहेत आणि अशा परिस्थितीत पतंजलीची ही भूमिका त्यांना बाजारात वेगळी ओळख देते. त्यांची पॅकेजिंग रणनीती पर्यावरण संरक्षणाला चालना तर देतेच, पण त्यांच्या ब्रँड इमेजलाही (Brand Image) बळकटी देते. ग्राहक आज पतंजलीकडे आधुनिक, विश्वासार्ह आणि पर्यावरणासाठी जबाबदार कंपनी म्हणून पाहतात."

पुनर्वापर आणि स्थानिकांचा सहभाग

पतंजलीने सांगितले की त्यांनी त्यांच्या पॅकेजिंगमध्ये वापरलेले सर्व साहित्य पुनर्वापरयोग्य (Recyclable) आहे, ज्यामुळे कचरा कमी करण्यास मदत होते. त्याशिवाय, त्यांच्या पुरवठा साखळीत (Supply Chain) स्थानिक शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना सामावून घेतले आहे, ज्यामुळे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमेला पाठबळ मिळते.