Horoscope Today 28 August 2024 : पंचांगानुसार, आज 28 ऑगस्ट 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


घरातील आनंदी वातावरण अनेक जवळच्या लोकांची मने जोडून जाईल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


घराभोवती असलेल्या छोट्या बागेसाठी जास्तीत जास्त वेळ द्याल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


घरामध्ये तरुण वर्गाची येजा वाढल्यामुळे एक नवे चैतन्य अनुभवाल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचा योग्य मिलाफ झाल्यामुळे आत्मविश्वास बळावेल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


एखाद्या गोष्टीसाठी धडाडी दाखवाल. तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


व्यवसायात एखादा दृढनिश्चय कराल, त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


स्वतंत्रपणे कार्य करण्यात आला त्याला इतर सर्वांची साथही मिळेल. 


वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)


सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जाल. महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा लोकांवर प्रभाव पडेल.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


घरामध्ये मी म्हणेल ती पूर्व दिशा असे धोरण अवलंबल्यामुळे वादावादीचे प्रसंग उदभवतील.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


तुमचे कडक मर्मभेदी बोलणे यामुळे दुसऱ्यांची मने दुखावून जातील.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


थोड्या लहरी स्वभावामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात.


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज बौद्धिकदृष्ट्या कोणाला हार जाणार नाही. साहित्यिक आणि संशोधक त्यांना आपल्या कामांमध्ये यश मिळेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Numerology : अतिशय तापट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; अगदी क्षणात होतात हायपर, नेहमी नाकाच्या शेंड्यावर असतो राग