Horoscope Today, 25 June, 2022 : आज ज्येष्ठ महिन्यातील अमावास्या असून, भरणी नक्षत्र आहे. चंद्र मेष राशीत असून, संध्याकाळी 05.03नंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. शनी आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचा खर्च मर्यादेपलीकडे वाढू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी राग आणि उत्साहाचा अतिरेक टाळा. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...  


मेष (Aries Horoscope) : खर्च मर्यादेपलीकडे वाढू शकतो. मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ राहू शकता. वाहन जपून चालवणे आणि विरोधकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील आणि नोकरीमध्ये दिवस अनुकूल असेल. उधार घेतलेले पैसे आज सहज परत मिळू शकतात. तुमची फसवणूक होऊ शकते. आज जमीन खरेदी-विक्री टाळा. प्रत्येक निर्णयात सावधगिरी बाळगा. अनावश्यकपणे पैसे खर्च करणे थांबवा आणि बचत सुरू करा.

वृषभ (Taurus Horoscope) : तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवा. शेजाऱ्याशी भांडण तुमचा मूड खराब करू शकते. प्रेमपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या यशात अडथळे आणणाऱ्यांना अधोगतीला सामोरे जावे लागेल. राग आणि उत्साहाचा अतिरेक टाळा. संभाषणात संयम ठेवा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. भावांसोबत कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.


मिथुन (Gemini Horoscope) : नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. मनःशांती असेल, पण आत्मविश्वासाची कमतरता असेल. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. स्वभावात चिडचिडेपणाही राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. मानसिकदृष्ट्या तुम्हाला खूप तणाव जाणवेल. तब्येत थोडी कमजोर राहील, तुम्ही आजारी पडू शकता.


कर्क (Cancer Horoscope) : बौद्धिक कार्यात व्यस्त राहाल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. खर्च वाढतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नवीन व्यवसाय सुरू होण्याची अपेक्षा आहे. लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात शुभ कार्य होऊ शकते. कोणत्याही मालमत्तेतून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. थकवा आणि आळशीपणामुळे महत्त्वाची कामे चुकू शकतात. स्वभावात नम्रता ठेवा. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात.


सिंह (Leo Horoscope) : आर्थिकदृष्ट्याही आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी ठरू शकतो. जवळच्या व्यक्तीची भेटही होऊ शकते. घरातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. काही महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी प्रवासासाठी चांगला नाही. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकता. आरोग्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. अधिक मेहनत करावी लागू शकते.


कन्या (Virgo Horoscope) : नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा राहील. जुने मित्र भेटू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल, तर तीही आज पूर्ण होईल. काही महत्त्वाच्या कामात नक्कीच यश मिळेल. पैशाशी संबंधित कोणतीही अडचण दूर झाल्यामुळे उत्पन्नात पुन्हा वाढ होईल.


तूळ (Libra Horoscope) : वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहावे. मानसिक अस्वस्थता राहील. व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सहकार्यही मिळेल. मेहनत करावी लागेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. अचानक खर्च वाढल्याने मनात निराशा राहील. असे असूनही, कुटुंबातील कोणीतरी दूरच्या प्रवासाला जाऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमची दिनचर्या बिघडू शकते. सर्व निर्णय स्वतः घ्या.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : जेवढी मेहनत कराल, तेवढे चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणींवरही मात करता येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे तुमच्यामध्ये संशय किंवा अंधश्रद्धा निर्माण होऊ शकते. नातेसंबंध बिघडू शकतात. घरातील मोठ्यांचा आदर करा. तुमच्यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. घरातील वातावरण प्रसन्न व स्वच्छ राहील. अतिरिक्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. कामाची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील.


धनु (Sagittarius Horoscope) : प्रतिष्ठित लोकांशी भेटणे फायदेशीर ठरेल. व्यक्तिमत्वही उजळेल. यावेळी नवीन यश मिळेल, जे भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कोणत्याही अनैतिक कृत्यात भाग घेऊ नका. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. मौजमजेमुळे विद्यार्थी त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात. पती-पत्नीमध्ये काही गैरसमजामुळे वाद निर्माण होऊ शकतात.


मकर (Capricorn Horoscope) : शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने दीर्घकाळ नफा मिळू शकतो. दूरचे नातेवाईक तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुम्ही दिवसभर उत्साहात असाल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. जमिनीशी संबंधित कामांची कागदपत्रे व्यवस्थित तपासा. हितचिंतकाशी न्यायालयीन प्रकरणावर चर्चा करा.


कुंभ (Aquarius Horoscope) : पैशाच्या व्यवहारात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्यासोबत काही फसवणूक होऊ शकते. घरातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी बुद्धीचा वापर करा. कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका. कामाच्या ठिकाणी घेतलेले ठोस निर्णय चांगले आणि यशस्वी ठरतील. घरातील व्यवहारात ढवळाढवळ करू नका आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य उत्तम राहील. ऑफिसमधील कामात गती येईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल.


मीन (Pisces Horoscope) : नवीन आर्थिक व्यवहारातून पैसे मिळू शकतात. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करू शकते. लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात तेढ निर्माण होऊ शकते. प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ घालवा. यामुळे तुमचे नाते सुधारेल. नोकरदार लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मेहनत करावी लागेल. मन चंचल राहील. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :