Horoscope Today 25 August 2024 : पंचांगानुसार, आज 25 ऑगस्ट 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


पैशाच्या संदर्भातली कामे मार्गी लागतील.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


काम झाल्याचा मानसिक आनंद मिळेल. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ राखून ठेवा.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


घरामधील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीविषयी थोडी चिंता वाटेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांना आज भरपूर कष्ट आहेत. महिलांना प्रवास आणि छंद यामुळे विरंगुळा मिळेल.


सिंह रास (Leo Horoscope Today)


आज पैसे खर्च करताना विचार करणार नाही. आपली हौस मौज पूर्ण कराल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


विद्यार्थी आपल्या करिअरचा विचार करतील. स्वप्न अवश्य पहा, परंतु त्याची वास्तवाशी सांगड घाला. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


व्यसनांपासून सावध राहा, नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल.


वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)


स्वभाव थोडा हट्टी आणि लहरी बनल्यामुळे प्रसिद्धी मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होतील.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आर्थिक बाबतीत अडचणी, संकटं येण्याची शक्यता आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


अतिउत्साही, साहसी स्वभावाला थोडा आळा घाला. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


भावंडांना परदेशात जाण्याच्या संधी मिळतील. आपल्या हजरजबाबी बोलण्यामुळे इतरांची मने जिंकून घ्याल.


मीन रास (Pisces Horoscope Today)


लेखकांना नवनवीन कल्पना  सुचतील. वैवाहिक स्वप्न मिळण्यासाठी तडजोड करावी लागेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक