Horoscope Today 25 April 2024 : पंचांगानुसार, आज 25 एप्रिल 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज प्रगतीपथावर राहाल. कापड खाद्यपदार्थ चैनीच्या वस्तू सौंदर्यप्रसाधने सोने-चांदी इत्यादी वस्तूंच्या व्यापारात चांगला पैसा मिळेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


भाग्याची साथ चांगली मिळून आपल्या हक्कांना बाधा न आणता स्वतःचे हित कसे जपायचे हे चांगले साधून जाल. महिला बुद्धीच्या जोरावर पुढे जातील. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


स्थावर इस्टेट संबंधी अडकलेली कामे मार्गी लागतील. त्यापासून लाभही मिळेल. आर्थिक आणि सामाजिक दर्जा प्राप्त होईल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आपल्या साध्या प्रत पोहोचण्यासाठी एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा जबरदस्त कराल. परंतु त्याबरोबर पक्की व्यावहारिक जोड ठेवायला मात्र विसरणार नाही. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


तुमच्या अस्तित्व जगाला दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न कराल.  


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरी व्यवसायात उच्च अधिकार मिळवण्याचे योग. घरामध्ये एखादी गोष्ट पटवून देण्यात यशस्वी व्हाल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


तुमच्या कलासक्त आणि रसिक वृत्तीला सुखावून टाकणारे ग्रहमान आहे. स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तुमच्या मनासारखे झाले नाही तर रागाचा पारा ताबडतोब चढेल. अहंकार दुखावला गेल्यास दुसऱ्यावर कुरघोडी करायलाही कमी करणार नाही. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


मुलांना तुमची मते न पटल्यामुळे वाद संभवतात. इथे सामंजस्याची भूमिका घेणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबामध्ये अचानक खर्च उद्भवल्यामुळे जेरीस याल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी पैसा खर्च होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत थोडा तोटा सहन करावा लागेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याचे प्रत्यंतर आज येईल. रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


स्वतःला सर्व कामे करावी लागल्यामुळे शारीरिक थकवा येईल. महिलांना आपल्या गुणाची कदर होत नाही हे जाणवेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Chanakya Niti : आयुष्यात कधीच पडणार नाही मागे; उंच भरारी घेण्यासाठी पक्ष्यांकडून शिका 'या' 4 गोष्टी, चाणक्य सांगतात...