Horoscope Today 24 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसून येईल. कारण बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आज तुम्ही कोणत्याही कामात निष्काळजीपणा केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचं बोलणं तुम्हाला ऐकावं लागू शकतं. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscoep)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात शुभ कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच ाबहेर पडा. तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. तसेच, आरोग्य चांगले राहील. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. गुरुवार असल्यामुळे दत्तगुरुंचा वार आहे. मात्र, तुमच्यासाठी आजचा दिवस काहीसा खास नसणार आहे. तणावपूर्वक आणि धावपळीचा आजचा दिवस जाईल. तसेच, तुमच्या आरोग्याबाबत बोलायचं झाल्यास, तुम्ही बाहेरचं तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळावं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shukra Nakshatra Gochar : अवघ्या 4 दिवसांनी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन, 'या' 3 राशी जगतील राजासारखं आयुष्य; प्रत्येक स्वप्न होणार पूर्ण