मुंबई : पाकिस्तानची आर्थिक स्थिती तर कोलमडली आहेच, पण सोबत आरोग्य व्यवस्थेचाही बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. पाकिस्तामध्ये अन्नपदार्थांसोबत आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लाच द्यावी लागत आहे. त्यांना तपासण्यासाठी डॉक्टर्स नाहीत आणि औषधांचा तर पत्ताच नाही. पाकिस्तामध्ये एकाच गोष्टीमध्ये सातत्यता आहे आणि ती म्हणजे रोज होणारे बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले. पाकिस्तान सरकार त्या देशात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांसाठी भारताला जबाबदार धरते, परंतु त्याच्या नागरिकांना साधे औषधे देखील पुरवू शकत नाही अशी स्थिती आहे.
पाकिस्तानी यूट्यूबर शोएब चौधरीने तिथल्या रुग्णालयांचा उल्लेख करताना सांगितले की, तेथील लोकांना औषध मिळत नाही आणि मिळाले तरी ते खूप महाग आहे. पाकिस्तानी यूट्यूबरने सर्वसामान्यांना विचारले की, पाकिस्तानने भारताशी थेट व्यापार करून औषधे खरेदी करावीत का? एका पाकिस्तानी रुग्णाने सांगितले की, तेथील रुग्णालयाची अवस्था अशी आहे की, अगदी लहान औषधही बाहेरून आणण्याचे प्रिस्क्रिप्शन दिले जाते. गेल्या चार दिवसांत बाहेरून 25 हजार रुपयांची औषधे आणल्याचे त्या रुग्णाने सांगितले.
भारताला विनंती करून औषधे खरेदी करा
शोएब चौधरी याने सांगितले की, भारतातून औषधे आधी दुबईला जातात आणि नंतर महाग होऊन ती पाकिस्तानात येतात. यावर एका रुग्णाने सांगितले की, " पाकिस्तानने भारताला विनंती करावी आणि थेट औषधांची खरेदी करावी. पाकिस्तानात काम करणाऱ्या डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे आमचे डॉक्टरही पाकिस्तान सोडून इतर देशात गेले, त्यांना येथे पैसे मिळत नाहीत."
आणखी एका व्यक्तीने सांगितले की, त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याने अनेक लोकांना आधीच पैसे दिले आहेत.
नमाज अदा करा, संकट दूर होईल
पाकिस्तानमध्ये औषधांचा आणि डॉक्टरांचा तुटवडा आहे. अशा स्थितीत एका पाकिस्तानी व्यक्तीने अजब उपाय सूचवला आहे. रोज नमाज अदा केल्यास हे संकट दूर होईल असं त्याचं मत आहे. तो म्हणाला की, "आम्ही नमाज अदा करत नाही ही आमची चूक आहे. जर आम्ही नमाज अदा करू लागलो तर आम्ही सर्व बरे होऊ. आपण एकमेकांना नमाजचे आमंत्रण दिले पाहिजे. अल्लाहतालाला पटवून द्या, इन्शाअल्लाह तुम्ही बरे व्हाल."
ही बातमी वाचा:
