Gudi Padwa 2025 Rajyog: हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडव्याचा दिवस हा हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढी पाडवा किंवा वर्षा प्रतिपदा किंवा उगादी (युगादी) म्हणतात. या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते. 'गुढी' म्हणजे 'विजयाचा ध्वज', गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा शुभारंभ आहे. हा सण केवळ आनंदाचे प्रतीकच नाही तर जीवनात नवा उत्साह आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे. यासोबतच या दिवसाचे ज्योतिषीय महत्त्वही खूप जास्त आहे. गुढीपाडव्याला तयार झालेल्या राजयोगाचा विशेष प्रभाव विविध राशींवर दिसून येणार आहे, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल आणि प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे. तर आधी जाणून घेऊया कोणते शुभ योग तयार होत आहेत-
गुढीपाडव्याला बनतायत मोठे शुभ योग
पंचांगानुसार, प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4.27 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 मार्च रोजी दुपारी 12.49 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 30 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी एक अतिशय शुभ योगायोग घडणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होईल आणि हा योग संध्याकाळी 5.54 मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय बव, बलव आणि कौलव करण योग तयार होतील. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते.
गुढीपाडव्याला 'या' 6 राशींचा 'गोल्डन टाईम' सुरू होतोय
मेष
गुढीपाडव्याच्या दिवशी मेष राशीच्या लोकांवर राजयोगाचा शुभ प्रभाव दिसून येईल. यावेळी तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायात नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते. नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला जे काम खूप दिवसांपासून करायचे आहे ते आता पूर्ण होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर आहे आणि काही नवीन गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला राहील. गुढीपाडव्याला तयार झालेला राजयोग तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देईल. तुम्हाला कामात यश मिळेल आणि नवीन संधीही तुमच्यासमोर येतील. यावेळी तुम्ही कोणत्याही विशेष योजना किंवा प्रकल्पात यश मिळवू शकता. आर्थिक दृष्टीकोनातूनही हा काळ अनुकूल असेल, त्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो.
कन्या
गुढीपाडव्याला राजयोगाचा प्रभाव कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. यावेळी तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. हा काळ तुमचे संबंध सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते.
मकर
गुढीपाडवा 2025 च्या दिवशी मकर राशीच्या लोकांना राजयोगाचे विशेष लाभ होतील. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. याशिवाय तुमच्या मेहनतीचा आणि प्रामाणिकपणाचाही आदर केला जाईल. यावेळी तुम्हाला एक मोठी संधी मिळू शकते, जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. याशिवाय आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील.
कुंभ
गुढीपाडवा 2025 रोजी कुंभ राशीच्या लोकांना राजयोगाच्या सकारात्मक परिणामांचा फायदा होईल. या दिवशी तुमचे भाग्य तुम्हाला नवीन संधी देऊ शकते. करिअर आणि व्यवसायात काही मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल अशी अपेक्षा आहे. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध दृढ होतील आणि जीवनात समृद्धी येईल.
हेही वाचा>>
Lucky Zodiac Sign: 24 मार्चपासून सुरू होणारा आठवडा 'या' 5 राशींसाठी पैशांचा पाऊस आणेल! राजयोग बनतोय, साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)