Horoscope Today 23 October 2024 : पंचांगानुसार, आज 23 ऑक्टोबर 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज मनाविरुद्ध थोड्या गोष्टी घडतील त्यामुळे प्रत्येक प्रसंगाचा शांतचित्ताने विचार करा.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज बरेच भावनाप्रधान व्हाल. जवळच्या लोकांबाबत कर्तव्य करावी लागतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज एखादी गोष्ट सहज हसण्यावारी घेऊन जाल. महिला व्यवहारावर आधारलेल्या मैत्रीचा फायदा उठवतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
चाकोरी बाहेरील जबाबदारी अंगावर घ्याल त्यामुळे तुमचा पराक्रम सिद्ध करण्याच्या अनेक संधी येतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरीत ज्यांना बदल करायचा आहे त्यांनी अवश्य विचार करावा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज समोर आलेली संधी आहे हे ओळखून सारासार विचार करून निर्णय घेऊन टाकावा.
तूळ रास (Libra Horoscope Today)
नवीन योजना मनामध्ये येऊन कल्पकतेने त्याचा विचार कराल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आता घरच्या लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
हक्कासाठी जगण्यापेक्षा कर्तव्याशी प्रामाणिक राहा म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
काही गोष्टींचा निर्णय तत्त्वज्ञानाच्या निसटत्या भूमीवर उभे राहून न घेता व्यवहार ओळखा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज महिलांनी कोणताही लोभ ठेवू नये. आपल्या कामाकडे लक्ष द्यावे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज फालतू गोष्टींमध्ये वेळ न घालवता मुख्य कामे करून घ्यावीत.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: