Horoscope Today 23 May 2024 : पंचांगानुसार, आज 23 मे 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल.तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आर्थिक स्थिती सुधारेल, त्यामुळे मनावरचा ताणही कमी होईल. महिलांना जास्तच मान मिळेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


मर्दानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तम ग्रहमान आहे. स्वतः करीत असलेल्या कामांमध्ये नवीन संशोधन करून त्या कामाचा फडशा पाडाल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


तरुण वर्गाला आपला जोडीदार निवडण्यामध्ये यश मिळेल. नोकरी व्यवसायात जे काम कराल त्यामध्ये लाभ मिळेल. 


कर्क (Cancer Horoscope Today)


अनेक क्षेत्रात रस घ्याल. त्यामुळे साहित्य संगीत किंवा अन्य कोणत्याही कलेशी जवळीक साधाल आणि त्याचा आनंद घ्याल. 


सिंह (Leo Horoscope Today)


सरकारी अडलेली कामे आवश्य करा. नोकरीमध्ये बदल घडवून आणण्याची योजना आखाल. 


कन्या (Virgo Horoscope Today)


वारा येईल तशी पाठ फिरवल्यास फायद्याचं ठरेल. नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी येतील. 


तूळ (Libra Horoscope Today)


तुमच्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात याल. गप्पिष्ट पण अभ्यासू व्यक्ती तुमचा फायदा करून देईल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


घरामध्ये मोठ्या माणसांशी तुमची मतं जुळणार नाही, त्यामुळे वाद होऊ शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची तुमची पद्धत नावीन्यपूर्ण राहील. महिला आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढतील.


मकर (Capricorn Horoscope Today)


तुमच्या भावना सगळ्यांपर्यंत नीट पोहोचू शकणार नाहीत, त्यामुळे गैरसमज होऊ शकतात. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


फसव्या आणि लबाड माणसांपासून सावध राहा. तुमची मतं इतरांना न पटल्यामुळे थोडे वाद विवाद होतील. 


मीन (Pisces Horoscope Today)


पैशाची परिस्थिती सुधारेल, त्यामुळे खरेदीचा मूड राहील. मान आणि अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करा.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Mercury Transit : पुढचे 3 दिवस 'या' 4 राशींसाठी वरदानाप्रमाणे; बुध करणार धनवर्षाव, नवीन नोकरीच्या संधीही येणार धावून