Horoscope Today 22 July 2024 : पंचांगानुसार, आज 22 जुलै 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


वैवाहिक जीवनात थोडी वादळे निर्माण होतील. मतभेद सामंजस्याने सोडवणे हितकर ठरेल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


जुनी दुखणी डोके वर काढतील. सांधेदुखीचा पाठदुखीचा त्रास संभवतो. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


कलाकार ना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल. डोळ्याच्या विकारांमध्ये विशेषतः उजव्या डोळ्याला जरा जास्त त्रास होईल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कौटुंबिक सुखात थोडी कमतरता निर्माण होईल. स्त्रियांमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे.


सिंह रास (Leo Horoscope Today)


जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. महिलांना एकटेपणा जाणवेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


गोंधळ घालणारे आणि निर्णय पटकन न घेणाऱ्या माणसांशी आज तुमचे जमणार नाही. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


कामाच्या वेळी कामच करावे हा तुमचा आज दृष्टिकोन राहील. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


उत्तम नेतृत्वाचा नमुना म्हणून तुमच्याकडे लोक बोट दाखवतील. महिला अनेक गोष्टींची सुरुवात मोठ्या उत्साहाने करतील.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


मानापमानाच्या कल्पना जरा टोकदार होतीलच परंतु थोडा अहंकारही आज वाढणार आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


अंतर्मुख होऊन विचार करायला लागेल नाहीतर पोकळ डामडौल किंवा हीन अभिरूची कडे आकर्षित व्हाल.


कुंभ रास  (Aquarius Horoscope Today)


व्यवसाय नोकरी स्वतः काम करण्यापेक्षा दुसऱ्याकडून काम करून घेण्याची वृत्ती वाढेल. 


मीन रास  (Pisces Horoscope Today)


धरसोड वृत्तीमुळे कोणतेही काम पूर्णत्वाला जाणार नाही. जवळ असलेल्या सर्व पैसा खर्च कराल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Weekly Horoscope 22 July To 28 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक