Horoscope Today 20 May 2024 : पंचांगानुसार, आज 20 मे 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


कोणताही आर्थिक निर्णय आज घेऊ नये, तो फायदेशीर ठरणार नाही. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.


वृषभ (Taurus Horoscope Today)


नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी कष्ट पडतील. महिलांना जरा नमतेच घ्यावे लागेल. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


तुमची कला लोकांच्या समोर येईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद थोडे चिघळतील.


कर्क (Cancer Horoscope Today)


आपला पराक्रम सिद्ध करणे ही जादू नाही, ती एक साधना आहे हे लक्षात ठेवा. महिला आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढे जातील. 


सिंह (Leo Horoscope Today)


अचानक प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या संधी चालून येतील. पण आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. 


कन्या (Virgo Horoscope Today)


उष्णतेचा त्रास वाढेल. घरामध्ये अचानक येणाऱ्या खर्चांना तोंड द्यावे लागेल.


तूळ (Libra Horoscope Today)


घरात दुरुस्तीची कामे निघतील. बरेच दिवसांपासून मनामध्ये काही योजना असतील त्यांना योग्य संधी मिळेल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


आज जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असेल. प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज आकलन शक्ती वाढेल, या गुणाचा उपयोग करून घ्या. महिलांनी आपल्या कामाबाबत जागृत राहावे.


मकर (Capricorn Horoscope Today)


वृत्तीत संथपणा जाणवेल. असुरक्षिततेची भावना तुम्हाला बेचैन करेल. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


थोडा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. समोरच्या माणसाच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. 


मीन (Pisces Horoscope Today)


आपण करत असलेल्या कामांमध्ये काहीतरी बदल करावा असे वाटत राहील. परंतु संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग सापडेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या