Horoscope Today 20 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 20 फेब्रुवारी 2024, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?  मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...


मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)


तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर आज काय काय काम करायचं आहे याची आधीच योजना करा, तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांनी त्यांचं नेटवर्क वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरुणांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे खांदे दुखू शकतात. लव्ह लाईफमध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. पैसा जपून खर्च करा, या आठवड्यात तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते.


कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)


आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत तुम्हाला आज उच्च अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागेल. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. आजचा दिवस तणावमुक्त असेल. पालकांसोबत वेळ घालवला तर तुम्हाला अधिक बरं वाटेल. आज वाहन नीट चालवा, वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्ही ध्यान करू शकता किंवा स्वत:ची डायरी लिहू शकता. आज तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नोकरीत दिवस चांगला जाईल.


मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)


नोकरीत तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या संस्थांमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. व्यवसायात पैसे गुंतवणं टाळा, आजचा दिवस चांगला नाही. तरुणांनी आपलं काम आज शांत मनाने करावं. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. आज तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तुमचं अडकलेलं काही मोठं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज सोन्यात गुंतवणूक करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani 2024 : शनीचा कुंभ राशीत होणार उदय; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, आर्थिक लाभाचेही योग