Horoscope Today 19 October 2024 : आज 19 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस आहे.शनिवारचा दिवस हा शनीदेवाचा वार म्हणून ओळखला जातो. शनीदेव प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे आजच्या दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे? कोणत्या राशीला आपल्या कर्माचं फळ मिळेल? तसेच, आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्हाला आजच्या दिवशी एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमच्याकडे एकापाठोपाठ अनेक कामे येत राहतील. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला तुमच्या कामा संदर्भात इतरांची विनवणी करावी लागेल. जर तुम्हाला कोणाकडून पैसे उधार घ्यायचे असतील तर आधी विचार करा. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. तुमच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. आज संध्याकाळच्या वेळी तुमची भेट तुमच्या जुन्या मित्राबरोबर होईल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परिवर्तनाचा असेल. जर तुम्हाला व्यवसायाच्या बाबतीत काही समस्या जाणवत असतील तर त्या लवकरच दूर होतील. तसेच, नवीन वाहन घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कुटुंबातील वातावरण चांगलं असेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसन्नतेचा असेल. जर तुम्ही एखाद्या कामासंदर्भात बाहेर जाणार असाल तर तुमचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज एका खास व्यक्तीशी तुमची भेट होईल त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या कामासंदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर उगाच मध्ये पडू नका. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मैत्रीपूर्ण असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या संदर्भात तुम्ही आज महत्त्वाचा निर्णय घ्याल. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते वेळीच परत करा. संपत्तीच्या बाबतीत तुमच्या घरात तणावाचं वाद असण्याची शक्यता आहे. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. वडिलोत्पार्जित कंपनीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या कामात जोडीदाराची चांगली साथ लाभेल. तुम्ही मिळून नवीन व्यवसाय सुरु करु शकता. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. सकाळपासूनच तुमच्या समोर अनेक कामांचा डोंगर उभा राहील. त्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत तुम्ही चिंतेत असाल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुमचे महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून थांबले असेल तर ते लवकर पूर्ण होईल. तसेच, तुमच्या उत्पन्नात आणखी वाढ झालेली दिसेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नोकरी मिळेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमची जवळच्या व्यक्तीशी भेट होईल. तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरु असतील तर ते लवकरच संपतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे आरोग्य चांगले राहील. फक्त बदलत्या वातावरणानुसार आहारात बदल करा. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ऑफिसमधील वातावरण चांगलं असेल. जर तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर वाद सुरु असतील तर ते लवकरच संपतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 19 October 2024 : आज 'या' 5 राशींवर शनी देव होणार प्रसन्न; इच्छित फळ लवकरच मिळणार, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य