Sagittarius Horoscope Today 19 May 2023 : धनु राशीचे जे लोक राजकीय क्षेत्रात आपले भविष्य करु इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. तुम्हाला सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. तसेच राजकीय नेत्यांना देखील भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या सर्व कामांचे कौतुक केले जाईल. जाणून घेऊया धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Rashibhavishya).
आर्थिक लाभ होण्याची शक्यता
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. सरकारी क्षेत्रातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन अधिकारी मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला व्यवसायात नवीन करार मिळतील. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित प्रवासावर जाण्याचे देखील योग आहेत. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर असेल. आज तुम्हाला सर्व क्षेत्रातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल
तुमच्या नोकरीत तुम्हाला प्रगती मिळण्याचे संकेत आहेत. तसेच तुम्ही तुमच्या मेहनतीने स्वत:चे नाव कमवाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुम्ही तुमच्या मधुर बोलण्याने तुमची सगळी कामं पूर्ण कराल. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करु नका. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच तुम्हाला सभांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सगळेजण कौतुक करतील.
धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहतील. तसेच एकमेकांचे सल्ले घेऊन घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल. मुलांच्या लग्नामध्ये विघ्न येत असेल तर ते देखील दूर होऊन जाईल.
धनु राशीचे आजचे आरोग्य
दांतांच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
धनु राशीसाठी आजचे उपाय
विष्णुची पूजा करा आणि गाईला नैवेद्य दिल्यास फायदेशीर ठरु शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, या राशींच्या लोकांसाठी 3 हा शुभ अंक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)