Horoscope Today 19 April 2024 : पंचांगानुसार, आज 19 एप्रिल 2024, आजचा दिवस शुक्रवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


कोणतेही काम करताना योग्य समय सूचकता ठेवून कामे पार पाडाल. महिलांची वृत्ती चौकस राहील 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


तुमच्या बोलण्यामुळे कामे मार्गी लागतील. संततीसाठी काही कारणाने पैसा खर्च करावा लागेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


कफ विकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे. अति विचारामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याचा संभव आहे 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर अडचणीतून मार्ग काढाल. स्वतःचा मान राखून घ्या. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


आर्थिक दृष्टीने फायदेशीर ग्रहमान नसले तरी स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची तयारी दर्शवाल 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


व्यापार उद्योगात मानाच्या चांगल्या संधी मिळतील. त्याचा फायदा पुढच्या दृष्टीने होणार आहे 


तूळ रास (Libra Horoscope Today)


शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. लेखकांच्या हातून उत्तम लिखाण होऊ शकते.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


महिलांना ऐन अडचणीच्या वेळी योग्य ती मदत मिळेल. नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचा जोश आणि तडफ तुमच्यात राहील. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


तुम्ही आतापर्यंत केलेल्या कष्टाचा फायदा मिळेल. अचानक प्रवासाचे योग येतील. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


तुमच्या ध्येयाच्या आड येणारा कोणताही मोह टाळलेला बरा पडेल. तुमच्यातील पराक्रमाला संधी मिळेल 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


तुम्ही ठरवलेली कामे पूर्णत्वाच्या मार्गाला लागतील. सभोवताली घडणाऱ्या अनेक गोष्टी मानसिक बळ देणाऱ्या ठरतील. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


जोडीदाराच्या उत्तम सहकार्यामुळे शांतीचा अनुभव घ्यायला. व्यापारात थोडी दूरदृष्टी फायद्याची ठरेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीला केळीच्या झाडाची पूजा का करतात? भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय करा