Horoscope Today 18 October 2024 : आज 18 ऑक्टोबरचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस. आजच्या दिवसाबद्दल बोलायचं झाल्यास, आजच्या दिवसाचा काही लोकांना लाभ तर काही लोकांना तोटा होणार आहे. त्यानुसार, आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - ज्यांना नुकतीच नवीन नोकरी मिळाली आहे, त्यांनी सतत रजा घेऊ नका. अन्यथा, तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने खूप मेहनत केली तर ते डील मिळवू शकतात ज्यासाठी ते बरेच दिवस प्रयत्न करत होते.
तरुण (Youth) - बाहेरील व्यक्ती तरुणांचे मन दुखवू शकते, म्हणून तुम्ही कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका. अन्यथा तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. तुमच्या पालकांशी बोला, तुमच्या पालकांना उद्या एकटे वाटू शकते.
आरोग्य (Health) - आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जास्त कामामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे तुमची प्रकृतीही बिघडेल. ण्याच्या सवयींमध्ये थोडे संतुलन ठेवा आणि तळलेले अन्न खाणे टाळा.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरीच्या ठिकाणी काम करताना थोडा गोंधळ होईल. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या, कारण तुम्ही जितक्या लवकर तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्याल तितक्या लवकर तुमचे काम पूर्ण होईल.
व्यवसाय (Business) - जे लोक आपला वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्यानेच पुढे जावे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल.
आरोग्य (Health) - मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या आज देऊ शकतात, जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला आराम मिळेल. आराम मिळत नसेल तर बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - जे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या पदोन्नतीबद्दल बोलू शकतात आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात.
व्यवसाय (Business) -व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नका.
तरुण (Youth) - आपले कौशल्य अद्ययावत करण्याचे नियोजन केले पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या घराच्या अग्निशमन यंत्रणेची थोडी काळजी घ्यावी, यासोबतच स्वयंपाकघरात काम करताना थोडी काळजी घ्या.
आरोग्य (Health) - तुमच्या डोळ्यांची थोडी काळजी घ्या, कारण तुम्हाला डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे इत्यादीमुळे खूप त्रास होऊ शकतो.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कर्क राशीसाठी चांगला दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घडताना दिसून येतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे.
व्यवसाय (Business) - जर तुम्हाला एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे. वातावरणात सकारात्मक बदल घडताना दिसतील. धार्मिक कार्यात मन गुंतलेलं असेल.
आरोग्य (Health) - कोणतीही परिस्थिती आली तरी त्यात लगेच पॅनिक होऊ नका. डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवेल.
सिंह रास (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुमच्या कामकाजात दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. अशा लोकांपासून सावध राहा. तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्यायला शिका.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील.
विद्यार्थी (Student) - तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल.
आरोग्य (Health) - आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अन्यथा आजार जास्त वाढू शकतो.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - फायनान्सच्या संबंधित क्षेत्रात आज चांगले बदल दिसून येतील. आठवड्याची सुरुवात चांगली जाईल.
व्यवसाय (Business) - व्यवसायात प्रगती तर होईलच पण ती जपूनही ठेवता आली पाहिजे.
कुटुंब (Family) - कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. अनेक सकारात्मक बदल दिसतील.
आरोग्य (Health) - बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतील. जसे की, पिंपल्स, बीपी, मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवतील.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुमचा कामात दिवस सामान्य असणार आहे. पण, दुपारनंतर कामाचा ताण जास्त असेल. त्यामुळे थोडा थकवा जाणवेल.
व्यवसाय (Business) - तुमचा व्यापार सुरळीत चालणार आहे. तसेच, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.
विद्यार्थी (Student) - स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळू शकतं.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा तब्येत बिघडू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला. तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या घरात पैशांचा वाद होऊ शकतो.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.
व्यवसाय (Business) - सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.
विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. कामात चपळता दाखवा.
व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा.
युवक (Youth) - जर काही कारणास्तव तुमच्या अभ्यासात ब्रेक लागला असेल तर तुम्ही अभ्यास पुन्हा सुरु करू शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल. पण, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल.
व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे.
लव्ह लाईफ (Relationship) - आज तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही कारणास्तव खटके उडू शकतात. सामंजस्याने निर्णय घ्या.
आरोग्य (Health) - महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
मीन रास (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका.
युवक (Youth) - आज तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. मग ते शाळेच्या संदर्भात असो, महाविद्यालय किंवा अगदी घरी. कडक शिस्त पाळा.
आरोग्य (Health) - आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: