Horoscope Today 14 May 2024 : पंचांगानुसार, आज 14 मे 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


पैशाची बाजू समाधानकारक राहील. घरामध्ये जोडीदाराशी थोडे मतभेद संभवतात. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


धंद्यात भागीदाराशी तडजोड करण्या व्यतिरिक्त काही मार्ग दिसणार नाही. कीर्ती आणि प्रसिद्धीचे योग येतील.


मिथुन (Gemini Horoscope Today)


स्थावर इस्टेटीसंबंधी सरकारी कामं अडलेली असतील ती करायला हरकत नाही. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे.


कर्क (Cancer Horoscope Today)


कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी मित्रमंडळींचे सहकार्य सहज मिळेल. महिला कामाला जास्त महत्व देतील. 


सिंह (Leo Horoscope Today)


नोकरीधंद्यात स्पर्धेला तोडीस तोड उत्तरे द्याल आणि कामाचा फड शा पाडाल. महिला जे ठरवतील त्यापेक्षा वेगळीच कृती करतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


नोकरीत वरिष्ठांची मर्जी मिळवाल. मानसिक स्वास्थ मिळेल. महिला आपल्या आवडीनिवडी जपतील.


तूळ (Libra Horoscope Today)


अचानक धनलाभाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. स्त्री वर्गाकडून फायदा होईल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


अध्यात्माची आवड असणाऱ्यांची उपासना मार्गात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


ज्या गोष्टींची इच्छा कराल त्याची इच्छापूर्ती होईल. तरुण आधुनिक फॅशनकडे ओढ घेतील.


मकर (Capricorn Horoscope Today)


मोठ्या भावंडांबरोबर फायद्याच्या गोष्टी घडतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. आर्थिक घडी व्यवस्थित बसली तरी पैशाला अनेक वाटा फुटतील.


मीन (Pisces Horoscope Today)


नको त्या गोष्टींचा विचार केला तर मनस्ताप सहन करावा लागेल. वैवाहिक जीवनात वादळे निर्माण होतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, पैशांची आवक वाढणार