Horoscope Today 13 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 13 सप्टेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज प्रगतीचा वेग वाढत असल्याने जादा भांडवलाची गरज भासेल, पूर्वी केलेल्या कष्टा आत्ता उपयोगी पडतील

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रदेशात ज्यांचे व्यवहार चालतात अशा लोकांना आर्थिक फायदा मिळेल, त्यांचा जोडधंदा आहे त्यांनी आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना फायदा होईल, मॅनेजमेंटच्या व्यवसायात असणाऱ्यांनी कामाचे उत्तम नियोजन करण्यावर भर द्यावा

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या बाबतीत लोकांचे गैरसमज फार पटकन होतील, महिलांचा शब्द घरामध्ये झेलला जाईल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करायचे आहे, त्यांना आजचा दिवस चांगला आहे घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज भावंडांचे सहकार्य मिळेल, करिअरमध्ये योग्य संधी मिळण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज विलंबाने गोष्टी होतील, पण धीर सोडायचे कारण नाही, नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेताना सर्वांगीण विचार करावा लागेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज राजकारणात असलेल्या व्यक्तींना जनमानसासमोर आपली प्रतिमा चांगली निर्माण करावी लागेल, विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवणे आवश्यक

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील आडमुठेपणा इतरांना थोडा जास्त होईल, परंतु तुमच्या तापट स्वभावानुसार समोरच्याला बोलायचे धाडस होणार नाही

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज कोणतेही काम करताना तुमचा अहंकार बरोबरी इतरांना जाणवेल, दुसऱ्याच्या मताशी सहजासहजी तुम्ही सहमत होणार नाही

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज मानसिक अस्थिरता जाणवेल, सर्व परिस्थितीमध्ये शांत राहण्यासाठी उपासनेचा अवलंब केल्यास फायद्याचे ठरेल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज अनेक ठिकाणच्या बातम्या तुम्हाला आपोआप मिळतील, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कामांमध्ये करता येईल.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा! तुमच्यासाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)