Horoscope Today 10 May 2024 : पंचांगानुसार, आज 10 मे 2024, आजचा दिवस शुक्रवार. आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
यंत्रावर काम करणाऱ्यांनी आज काळजी घ्यावी. परदेशी गमनाची संधी मिळेल. महिलांना आपले छंद जोपासता येतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज तुमच्याशी स्पर्धा करणारे तुमची प्रगती पाहून माघार घेतील. कलात्मक काम करणाऱ्यांना अनेक संधी मिळतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज जरा फारच रसिक बनाल परंतु परिस्थिती पाहून आचरण ठेवणे आवश्यक आहे. महिलांनी आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज कामाचा व्याप प्रचंड असेल. त्यामुळे थोडी नाराजी अनुभवाल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले तर चिडचिड होणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
व्यवसाय धंद्यात कोणावरही जास्त विश्वास न ठेवता स्वतः जातीने कामाची पाहणी केली तर त्रुटी लक्षात येतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
पैशांची परिस्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत योग्य संधी मिळाल्या तरी कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
तुळ रास (Libra Horoscope Today)
कलाकारांच्या हातून सुंदर कलाकृती निर्माण होतील. आजचा दिवस चांगले वाईट असे मिश्र फळ देणारा आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी व्यवसायात थोडी संघर्षात्मक वातावरण लाभेल. काम करण्यामधील सुसंगतता ठेवलीत तर मन शांत राहील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
प्रतिकूल परिस्थितीत मनस्वास्थ्य थोडे हरवून बसाल. सहकारी व्यक्तींची मने तुमच्याशी जुळणार नाहीत.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कामाची कितीही घाई असली तरी कायद्यानुसारच मार्गक्रमणा करा. वरिष्ठांनी दाखवलेलां रुबाब थोडा महागातच पडेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
रात्रीचा दिवस करून काम करावे लागेल आणि एवढे करून जेवढा लाभ मिळायला हवा तेवढा मिळणार नाही. महिला नवीन कला शिकतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
महत्त्वाकांक्षा फार मोठी ठेवाल परंतु तेवढेच कष्टही करावे लागतील. मित्रमंडळी कडून मला मेसेज सहकार्य मिळणार नाही.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: