Astro Tips For Gifts : एखादा सण-समारंभ असे, कोणाचा वाढदिवस असेल की काही शुभ दिन असेल तर अशा वेळी भेटवस्तू (Gifts) अगदी सर्रास दिले जातात. पण, हे गिफ्ट्स निवडताना मात्र खूप विचार करून निवडले जातात. जसे की, त्या व्यक्तीला ती वस्तू आवडेल ना? ती वस्तू वापरात तर येणारी आहे ना? इथपासून ते अगदी बजेटपर्यंत सर्वच गोष्टींचा विचार केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्र किंवा ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या खास व्यक्तीला भेटवस्तू दिल्यास, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आनंद तर होतोच शिवाय त्याला शुभ परिणाम देखील मिळू शकतात. पण, त्याचबरोबर वास्तूशास्त्रात काही भेटवस्तू देणं अशुभ मानलं गेलं आहे. 


'अशा' भेटवस्तू देऊ नका


गिफ्ट्सच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, साधारणपणे घड्याळ ही अशी वस्तू आहे जी सहज उपलब्ध होते आणि वापरातही येते. त्यामुळे अनेकजण घड्याळ घेण्याचा पर्याय निवडतात. पण, वास्तूच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला घड्याळ गिफ्ट देणं अशुभ मानलं गेलं आहे. तसेच, घड्याळाबरोबरच एखाद्या व्यक्तीला परफ्युम गिफ्ट देणं देखील अशुभ मानलं गेलं आहे.    


नात्यात दुरावा येऊ शकतो


अनेकदा लोक एकमेकांना भेटवस्तू म्हणून रुमाल द्यायलाही आवडतात. पण, ज्योतिषशास्त्रात असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही. असे केल्याने तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. यासोबतच शूज, चप्पल इत्यादी भेटवस्तू देणेही चांगले मानले जात नाही.


चुकूनही हे गिफ्ट देऊ नका


महाभारत हा जरी पौराणिक ग्रंथ असला तरी तो घरात ठेवल्याने नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. त्यामुळे वादाची, क्रूरतेची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत महाभारत काव्य कोणत्याही व्यक्तीला भेट म्हणून देणे टाळावे. असे केल्याने त्या व्यक्तीबरोबरचे तुमचे नाते बिघडू शकते.


असे कपडे गिफ्ट्स म्हणून देऊ नका


बऱ्याच लोकांना एकमेकांना कपडे देखील गिफ्ट करायला आवडतात. पण, जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटवस्तू देत असाल तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की, कोणालाही काळ्या रंगाचे कपडे गिफ्ट्स म्हणून कधीही देऊ नका. कारण, वास्तूशास्त्रानुसार, काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 9 May 2024 : आजचा गुरुवार खास! शोभन योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य