Horoscope Today 10 June 2024 : पंचांगानुसार, आज 10 जून 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज आत्मविश्वासाने एखादं काम चांगलं कराल. कोणत्याही समस्याशी टक्कर द्याल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


आज जोमाने कामाला लागाल. नवीन आचार विचारांचा अवलंब कराल आणि व्यवसायात एक नवीन चैतन्य निर्माण कराल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


वारा येईल तशी पाठ फिरवण्याची हातोटी साधल्यामुळे बरीच कामे मार्गी लागतील. महिला बौद्धिक गोष्टीत रस घेतील.


कर्क (Cancer Horoscope Today)


समय सूचकतेमुळे अनेक तोटे आज तुम्ही वाचवू शकाल. राजकारणी लोकांना आपल्या मनाप्रमाणे काम करून घेण्याची संधी मिळेल.


सिंह (Leo Horoscope Today)


आज मी मी म्हणणाऱ्यांना गारद कराल. चित्रकला, फोटोग्राफी यांची आवड असणारे चांगल्या कलाकृती निर्माण करतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागण्यात सफल व्हाल. महिला दुसऱ्यांना जास्तीत जास्त मदत करतील. 


तूळ (Libra Horoscope Today)


आज इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल, परंतु स्वतःच्या मनाप्रमाणे जर कोणी वागलं नाही तर मात्र रागाचा पारा चढेल. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


जोडीदाराच्या आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी लागेल. कोणतेही कुपथ्य, अति कष्ट किंवा अति ताण प्रकृतीला जे झेपणार नाही.


धनु (Sagittarius Horoscope Today)


घरामध्ये स्वतःच्या मताशी ठाम राहाल. कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत राहणार नाही.


मकर (Capricorn Horoscope Today)


हाताखालच्या लोकांच्या मानी स्वभावाला तोंड द्यावे लागेल. तुमच्या कामांमध्ये घरातील लोकांचा सहभाग राहील.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


घरामधील काही कारणामुळे निर्माण झालेली अस्थिरता वाद-विवाद संपुष्टात येतील. गृहसौख्यात भर पडेल. 


मीन (Pisces Horoscope Today)


घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताप्रमाणे वागावं लागेल. त्यांचा अनुभव त्यांचे कष्ट या सर्वांचा पुढच्या पिढीला फायदा होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Weekly Horoscope 10 June To 16 June : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या