Horoscope Today 08 July 2024 : पंचांगानुसार, आज 08 जुलै 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल.या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


संततीच्या बाबतीत त्यांचे आणि तुमचे विचार यामध्ये तफावत राहील. त्यामुळे थोडे तटस्थ धोरण ठेवावे लागेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


तुम्ही केलेल्या संकल्पनांमध्ये अर्धी सिद्धी आहे हे लक्षात ठेवा तसे प्रयत्न करा. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आजचा दिवस तुमच्याकडून भरपूर कष्ट करून घेईल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य ही उत्तम मिळेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आज खूप आशावादी राहाल तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


आज बरीच कामे साध्य होऊन जातील. फक्त जिथे काम करायला तुम्हाला आवडेल तेथेच हजेरी लावाल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नको त्या ठिकाणी काम करावे लागल्यामुळे थोडे उदास व्हाल. महिलांना त्यांच्या कामाची पावती मिळेल.


तूळ रास  (Libra Horoscope Today)


आज तुमचे कर्तृत्व बहरेल परंतु कष्टाला सीमा राहणार नाही 


वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)


आज प्रकृती अस्वस्थ थोडे राहील. विचार थोडे भरकटण्याची ही शक्यता आहे. 


धनु रास  (Sagittarius Horoscope Today)


आज थोडे अस्थिर आणि चंचल मन राहील त्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आर्थिक घडी चांगली बसल्यासारखी वाटली तरी पैशाला अनेक वाटा फुटल्यामुळे जवळ पैसे राहणार नाहीत. 


कुंभ रास  (Aquarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात थोड्या गढूळ वातावरणाला सामोरे जावे लागेल. महिला थोड्या तापट बनतील. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


वरिष्ठांना किती जीव तोडून तुमचे म्हणणे सांगितले तरी त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे शांत राहणे हितावह.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Astrology news : पुढच्या 87 दिवसांपर्यंत 'या' 3 राशी राहतील हॅप्पी हॅप्पी; शनीच्या परिवर्तनाने पालटणार नशीब