Horoscope Today 06 September 2024 : पंचांगानुसार, आज 06 सप्टेंबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या यश मिळेल त्यामुळे अभ्यासामध्ये खोलवर जाऊन ग्रहण करण्याची शक्ती वाढेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील प्रकृती स्वास्थ्य मात्र सांभाळावे लागेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


एचबी कमी होणे रक्तामध्ये दोष पायाची दुखणे यापासून सावधानता बाळगावी. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आज आहार विहार चांगला ठेवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हवे तसे वातावरण न लागल्यामुळे कामांमध्ये मन लागणार नाही. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


आज उच्च अभिरुची ठेवाल. महिलांनी तब्येतीकडे लक्ष द्यावे. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


गुप्त शत्रूंचा थोडासा त्रास जाणवेल व्यवसायात मशिनरीशी जास्त संबंध आल्यास सावधानता बाळगा.


तुळ रास (Libra Horoscope Today)


नोकरीमध्ये नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही परंतु तुमच्या बौद्धिक गोष्टींवर मात्र वरिष्ठ खूश होतील.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


काही गोष्टी तुमच्या हिताच्या झाल्यामुळे आनंदी राहाल तरुणांना स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यात आनंद वाटेल. 


धनु रास (Scorpio Horoscope Today)


लोकांमध्ये मिळून मिसळून राहाल. महिलांचा मूड आनंदी राहील. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


कोणत्याही कामासाठी जास्त कष्ट घेतल्याशिवाय यश मिळणार नाही. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कर्ज हवे असणाऱ्यांना त्याची तरतूद करता येईल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची स्थापना करताना 'या' दिशेला करा; जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?