Horoscope Today 05 November 2024 : पंचांगानुसार, आज 05 नोव्हेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


तुमच्यातील जिद्द कामाची शिस्त आणि धडाडी आज वाखाणण्याजोगी असेल 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर असतील त्याप्रमाणे नियोजनही कराल 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मानापमानाच्या कल्पना जरा टोकदार होतील त्यामुळे स्वतःहून कोणाकडेही कसलीही याचना करणार नाही


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कुटुंबामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल 


सिंह रास (Leo Horoscope Today)


तापलेल्या वातावरणात पाण्याचा शिडकावा देऊन परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी प्रयत्न कराल


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज कडक बोलणे टाळलेलेच बरे त्यामुळे बरेच काही साधून जाल


तुळ रास (Libra Horoscope Today)


घरातील धार्मिक कार्यात भाग घ्यावा लागल्यामुळे जास्त काम पडेल 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


स्वतःला इतरांपेक्षा हटके समजण्यात धन्यता मानाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


खूप काही ठरवलेत कामाचे नियोजन केलेत तरी कोणाची तरी मदत घ्यायला लागणार आहे 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करून घ्याल 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. महिला प्रेमळ बनतील 


मीन रास (Pisces Horoscope Today)


तुमच्या कर्तुत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. पुढील गोष्टींची अंतःस्फूर्ती जाणवेल


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा :


November Month Calendar 2024 : तुळशी विवाहापासून ते शिवरात्रीपर्यंत...नोव्हेंबर महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर...