Horoscope Today 05 January 2025 : पंचांगानुसार, आज 05 जानेवारी 2025, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज थोडा आळशीपणा वाढेल, परंतु काम करायचं मनाशी ठरवलंत तर नक्कीच कराल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
परदेश रमणाचे बेत आखले असतील तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही.
मिथुन (Gemini Horoscope Today)
महिलांचा मौजमजा करण्याचा मूड राहील. दिवस आनंदात जाईल.
कर्क (Cancer Horoscope Today)
तुमच्या मनातले इतरांना लवकर समजणार नाही. थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील.
सिंह (Leo Horoscope Today)
कोणत्याही निर्णयांमध्ये खंबीरपणा ठेवावा लागेल. दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहील.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज इतरांचे तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra Horoscope Today)
आज तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही,ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे त्यांनी काळजी घ्यावी.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
जुने ते सोने याला चिटकून बसाल,परंतु नावीन्याकडे झेप घेण्याचे आकर्षणही राहील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
नोकरी करणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
व्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यायला लागेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
महिलांना स्वभावाला मुरड घालावी लागेल. कोणतीही आर्थिक घडामोड आज नको.
मीन (Pisces Horoscope Today)
महत्त्वाच्या कामाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुटुंबात इतरांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: