Numerology : कुणावरही पटकन विश्वास ठेवतात 'या' जन्मतारखेचे लोक; यांच्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 8 असलेल्या व्यक्ती या खूप वेगळ्या असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमूलांक 8 हा शनीशी संबंधित आहे, मूलांक 8 हा शनिचा अंक आहे. मूलांक 8 असलेल्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या मूलांकाचे लोक स्वभावाने चालाख असतात. परंतु कधी कधी यांची फसवणूक होते.
मूलांक 8 चे लोक सर्वांसमोर पटकन व्यक्त होऊ शकत नाहीत, त्यांना स्टेज फियर असतं. परंतु, ते वैयक्तिकरित्या सर्वांशी चांगल्या गप्पा मारू शकतात. मूलांक 8 असलेल्या लोकांमध्ये आणखी कोणत्या खास गोष्टी असतात ते जाणून घेऊया.
8, 17 किंवा 26 जन्मतारीख असलेले लोक हे हुशार तर असतात, पण कधी कधी त्यांची फसवणूक होते. हे लोक अतिशय हलक्या कानाचे असतात, ते कुणाच्याही बोलण्यात पटकन फसतात.
ते समोरच्यावर लगेच विश्वास ठेवतात. कोण खरं, कोण खोटं याची जाणीव त्यांना नसते. कधी कधी खरं बोलणाऱ्याला ते खोटं समजतात आणि खोटं बोलणाऱ्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्यासारख्या ऐकतात.
मूलांक 8 चे लोक हे लावालावी करण्यात अग्रेसर असतात. याच्या गोष्टी त्याला आणि त्याच्या गोष्टी याला वाढवून-चढवून सांगण्यात त्यांना रस असतो.
याच सोबत समोरच्याला आपल्या संवाद कौशल्यातून आकर्षित करण्याचा गुण त्यांच्यात असतो. समोरच्याकडून स्वत:चा फायदा कसा करुन घ्यायचा हे यांना बरोबर समजतं.
मूलांक 8 असलेल्या लोकांना त्यांचा स्वाभिमान फार प्रिय असतो. जे बोलतात ते करुन दाखवण्याची धमक त्यांच्यात असते आणि तसं करता आलं नाही तर त्यांना अजिबात चैन पडत नाही. ठरवलेली गोष्ट करुनच ते शांत होतात.
मूलांक 8 चे लोक आव्हानांना घाबरत नाहीत. कठोर परिश्रम करुन यश मिळवणं त्यांना आवडतं आणि यामुळेच शनिदेव या लोकांवर नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळही देतात.
हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत आणि त्यांचा धैर्याने सामना करतात. कोणतंही काम करताना स्वत:ला त्यात पूर्णपणे झोकून देतात. आपल्या वेळेचा पूरेपूर वापर करतात. तसेच, पैशांची गुंतवणूकही फार सांभाळून करतात.