Horoscope Today 05 August 2024 : पंचांगानुसार, आज 5 ऑगस्ट 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन करावी.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज अहंकार सोडावा लागेल तरच इतरांशी संबंध चांगले राहतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
घरातील तरुण व्यक्तींची पुढारलेली मते न पटल्यामुळे संबंधात ताण-तणाव निर्माण होतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
व्यवसायात हाता तोंडाशी आलेला घास दूर गेल्यामुळे जरा मानसिक त्रास होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
चिकाटी आणि शिस्त याच्या जोरावर बरेच काही साधून जाईल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
वडिलोपार्जित मालमत्ते संबंधी निर्णय आज टाळलेले बरे.सरकारी धोरणांमुळे कामात अडथळे येतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जमवून घ्यावे लागेल.महिलांची कामे रेंगाळतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
खूप काळजी करण्याचा स्वभाव आज सोडून द्या त्यामुळे थोडी अस्थिरता जाणवेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी व्यवसायात गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. त्यामुळे मानसिक त्रास होईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
जुने दुखणे डोके वर काढतील. त्यासाठी औषधे आणि व्यायाम याची योग्य सांगड घाला.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तरुणांनी वाहने जपून चालवावीत. अचानक धनलाभ होऊ शकतो.
मीन रास (Pisces Horoscope Today)
विमा व्यवसायात असणाऱ्यांना ग्रहांची साथ मिळेल. धंदा वाढेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: