चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्यात केला असून यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, बीफ (Beaf) खाण्यास सरकारने बंदी घातलेली नसल्याने या कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळेच, साहजिकच या मुद्दयावरुन सातत्याने वादविवाद होतात. तर, अनेक गोरक्षकांकडून कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या जनावरांची किंवा गोवंशांची माहिती पोलिसांना देण्यात येते. चंद्रपूर (Chandapur) जिल्ह्यात तब्बल 1200 किलो गोमांस पडकण्यात आले आहे. तेलंगणातून आलेल्या टेम्पोमधून हे गोमांस विक्रीसाठी बाजारात नेण्यात येत होते. मात्र, पोलिसांना (Police) टीप मिळाल्यानुसार त्यांनी योग्य तो सापळा रचून हे गोमांस जप्त केलं आहे. याप्रकरणी, 5 जणांना अटकही करण्यात आली आहे.
देशी गाई आणि देशी बैलांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केल्यामुळे भाकड जनावरांसाठी निवारा, चाऱ्याचा प्रश्न आहे. मात्र, गोवंश हत्या करुन मोठ्या प्रमाणात मांसाची तस्करीही केली जाते. त्यातच, चंद्रपूर पोलिसांनी गाय-बैलांचे तब्बल 1200 किलो मांस जप्त केले केल्याचे उघडकीस आले आहे.
चंद्रपूर पोलिसांनी जप्त केलेल्या या मांसाची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे 13 लाख रुपये एवढी आहे. बर्फाच्या लादीत लपवलेले हे मांस कंटेनरसह ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, चंद्रपूर शहरातील 2 तर हैद्राबाद येथील 3 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांना गोवंश मांस मोठ्या प्रमाणात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने चोराळा येथे रचला सापळा, तेलंगणा राज्यातील एका ट्रकला थांबवून तपासणी केल्यावर गाय-बैल आणि वासरांचे अवयव असलेले, बर्फ़ात लपविलेले मांस आले आढळून आहे. एवढ्या मोठया प्रमाणात थेट कापलेले गोमांस जप्तीची ही चंद्रपुरातील पहिलीच कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात 2015 पासून गोवंश हत्या बंदी कायदा
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. महाराष्ट्रात 4 मार्च 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. गोवंश म्हणजे गाय, बैल आणि वळू या प्राण्यांची संख्या कमी होऊ नये आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा
मोठी बातमी ! मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर, फडणवीसांनीही बोलावली मराठवाड्यातील आमदारांची बैठक