Horoscope Today 04 May 2024 : पंचांगानुसार, आज 04 मे 2024, आजचा वार शनिवार.शनिवारचा वार हा शनी देवाला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


बौद्धिक कामे करणाऱ्यांना आजचा दिवस पर्वणी ठरणार आहे. परंतु नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीचा प्रत्ययही येईल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरी व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी नवीन काहीतरी करण्याचा संकल्प अवश्य कराल आणि तो तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहील विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे अभ्यास करता येईल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


संशोधन क्षेत्रात प्रगती होईल महिलांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


इतरांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल हिशोबला पक्के राहाल. महिलांना जास्त कष्ट पडले तरी समाधानी राहतील. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


दुसऱ्याशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवायला हवे. महिलांना काम करण्याचा उत्साह वाढेल. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


अभिमान आणि अहंकार यातील लक्ष्मण रेषा ओळखायला हवी. आपल्या मर्जीतील माणसासाठी खूपच उदार  बनाल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


स्थावर इस्टेट संबंधी कामे संघर्षातून मार्गी लागतील. धंद्यातील पार्टनर बरोबर समजुतीचे धोरण न ठेवल्यास वाद होण्याची शक्यता. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असले तरी टोकाची भूमिका महा गातच पडेल. महिला गोड बोलण्याने इतरांची मने जिंकून घेतील 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


वाद विवाद टाळून सहकार्याने समस्या सोडवाल. यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना फायदा होईल.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


मिळून मिसळून राहण्यामुळे आसपासचे वातावरण उत्साही ठेवाल. दुसऱ्यांना खूप मदत कराल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


कोणत्याही कारणामुळे स्वतःचे कार्यक्रम विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी थोडी तारेवरची कसरत करावी लागेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Chaturgrahi Yog 2024 : 10, 20 नाही तर तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार चौफेर लाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ