Horoscope Today 03 May 2024 : आजचा दिवस शुक्रवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक,धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
तूळ रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा राग आणि घाईगडबडीत तुमच्याकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जे काम करताय त्यात तुम्ही बेस्ट आहात.
तरूण (Youth) - लोकांवर अति विश्वास ठेवण्याची तुमची जी सवय आहे याचाच तुम्हाला आज पुन्हा त्रास होईल. तुमचं मन दुखावलं जाईल.
आरोग्य (Health) - तुम्ही जे काही काम कराल त्यात नीट काळजी घेऊन काम करा. तुमच्यावर आज अपघाताचा प्रसंग येण्याची किंवा काही अपरित घडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमचा पगार आणि प्रमोशनच्या संदर्भात तुमच्या बॉसशी बोलणं होऊ शकतं. चिंता करू नका. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
व्यापार (Business) - जे व्यापारी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूच्या संदर्भात व्यवहार करतायत त्यांना आज चांगला लाभ मिळू शकतो.
तरूण (Youth) - तुमच्या चांगल्या सवयींमुळे तुम्ही तुमच्या वयातील लोकांचं प्रेरणास्थान ठरू शकता.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, मानसिक तणावाच्या कारणाने तुमची सतत चिडचिड होईल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी (Job) - इतरांच्या प्रगतीवर बोट ठेवण्यापेक्षा थोडी जास्त मेहनत करून तुम्ही त्या जागेवर कसे जाल याचा विचार करा.
व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर विनाकारण चिडचिड करू नका. यामुळे तुमचा दिवस वाईट जाईल.
तरूण (Youth) - जे तरूण स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत घेत आहेत एक ना एक दिवस तुमच्या मेहनतीला नक्की यश मिळेल.
आरोग्य (Health) - जर तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर घरातून बाहेर पडताना नीट काळजी घ्या. धुळीच्या संपर्कात येऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: