Horoscope Today 03 March 2025 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वातावरण प्रसन्न राहील. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. कोर्टाशी संबंधित बाबींवर पूर्ण लक्ष द्यावे. तुमचा कोणताही जुना व्यवहार निकाली निघेल. पैशाशी संबंधित कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुमची घरातील कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या अनुभवांचा फायदा होईल. भावा-बहिणीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तेही दूर होतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादातून आराम मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते. नोकरीत बदलाची योजना कराल. विद्यार्थी आपले ज्ञान वाढवण्याची एकही संधी सोडणार नाहीत. आई तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकते, जी तुम्ही वेळेत पूर्ण कराल

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या व्यक्तीला एकाचवेळी अनेक कामे करावी लागत असल्यास त्यांची चिंता वाढेल. तुमची महत्त्वाची कामे पूर्ण कराल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. धार्मिक कार्यात तुम्हाला खूप रस असेल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.

हेही वाचा>>>

Shani Transit 2025: मार्चमध्ये शनि, सूर्यासह अनेक मोठे ग्रह ठरणार गेमचेंजर! मेष, कन्यासह 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होणार वाढ 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )