Horoscope Today 01 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या कामावर प्रगतीच्या संधी मिळू शकतात. 


व्यवसाय (Business) - आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. तुमच्या व्यवसायाबाबत भागीदाराशी वाद घालू नका.


विद्यार्थी (Student) - तरुणांनी त्यांच्या करिअरकडे खूप लक्ष दिलं पाहिजे, करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नीट अभ्यास केला पाहिजे, अन्यथा तुमच्या करिअरमध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात. 


आरोग्य (Health) - आज तुमची प्रकृती उत्तम राहील, पण जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी, खेळताना त्यांना दुखापत होऊ शकते.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरी (Job) - आजचा दिवस त्यांच्या नोकरदार लोकांसाठी अडचणीचा असेल, त्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु तुम्हाला आज तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळेल.


व्यवसाय (Business) - जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला जोडून नवीन काम सुरू करायचं असेल तर, त्यासाठी वेळ चांगला आहे. आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल.


विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी जुन्या चुकांवर पश्चात्ताप न करता नव्या संधी शोधायला सुरुवात करायला हवी. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.


आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी. तुम्हाला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही कुठे नवीन नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुमचं काम पूर्ण होऊ शकतं. 


व्यवसाय (Business) - भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील नफा-तोट्याबद्दल तुमच्या बिझनेस पार्टनरशी मोकळेपणाने चर्चा करा. उत्पन्नाचीही माहिती जरूर द्या.


विद्यार्थी (Student) - जर कोणी तुमच्याकडून कधी पैसे घेतले असतील तर आज तुम्हाला ते प्रलंबित पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला हलकं पोटात दुखू शकतं, परंतु तुम्ही औषध घेतल्याने तुम्हाला आराम मिळेल.


कर्क रास (Cancer Today Horoscope) 


नोकरी (Job) -  नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अधिक कामकाजाचा, तणावाचा असणार आहे. डोकं शांत ठेवून सगळी कामं करा. 


आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो. 


तरूण (Youth) - ज्या तरूणांना सरकारी नोकरीची इच्छा आहे त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 


कुटुंब (Family) - कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठी गरजूंना दान करा. 


सिंह रास (Leo Today Horoscope) 


नोकरी (Job) - ग्रहांच्या स्थितीनुसार, ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची. त्या दृष्टीने प्रयत्न करा. 


आरोग्य (Health) -आज तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल. 


व्यापार (Business) - जे शेअर मार्केटमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. काळजीपूर्वक पैशांची गुंतवणूक करा. 


तरूण (Youth) - आज तुमचा आत्मविश्वास काही ठिकाणी कमी पडू शकतो. अशा वेळी चिडचिड करू नका. शांत होऊन हनुमान चालिसेचा जप करा. 


कन्या रास (Virgo Today Horoscope) 


नोकरी (Job) - आज तुम्ही कामात जरा सावधानतेनेच काम करा. कोणाशीही कोणत्याही प्रकारे गॉसिपिंग करू नका.


आरोग्य (Health) - तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा. कारण बद्धकोष्ठतेच्या त्रासाने तुम्ही हैराण होऊ शकता. 


व्यापार (Business) - व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवशी कामात कदाचित समाधानकारक कमाई होणार नाही. पण, खचून जाऊ नका. 


कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा. 


तूळ रास (Libra Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणतीच भूमिका घेऊ नका. अन्यथा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. 


आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला छातीत दुखणं, नैराश्य, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात.


व्यवसाय (Business) - आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची तुम्ही लवकरच निवड करावी. 


प्रेमसंबंध (Relationship) - जर तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबर तुमच्या भावना शेअर करायच्या असतील तर तुम्ही त्या व्यक्त करू शकतात. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल 


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना तुम्ही कोणतीच घाई-गडबड करू नका. अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो. 


आरोग्य (Health) -  महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. 


व्यवसाय (Business) - जर तुमच्या व्यवसायात एखादं महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. 


युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. पण हा वाद जास्त वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही मैत्री गमवाल. 


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचे बॉस खूप खुश असतील. तुम्हाला नोकरीत बढतीची संधी देखील मिळू शकते. 


आरोग्य (Health) - ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा. 


व्यवसाय (Business) - जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. कारण याचा तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 


युवक (Youth) - जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते.


आरोग्य (Health) - आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.                                                                         


व्यवसाय (Business) - आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल.  पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल. 


तरूण (Youth) - तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी (Job)  - आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मान-सन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.    


आरोग्य (Health) -  तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 


तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेत चांगलं यश मिळवतील. तसेच चांगली नोकरीही करतील. 


कुटुंब (Family) - आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळू शकते. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. 


आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. 


व्यवसाय (Business) - तुमचा व्यवासाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल.


तरूण (Youth) - तरूणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे वाहन चालवताना जास्त वेगाने गाडी चालवू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Virgo July Horoscope 2024 : कन्या राशीचं करिअर गाठणार नवी उंची; नवीन महिन्यात अनपेक्षित धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य जाणून घ्या