Horoscope Today 01 July 2024 : पंचांगानुसार, आज 01 जुलै  2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


जुनी आणि वसूल होतील. हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळेल. एखाद्या कामाच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज तुमच्या यशाचं गमक तुमच्या इच्छाशक्तीत असणार आहे. गोड बोलून आपले काम व्यवस्थित करून घ्यावे.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


थोडे परंपरावादीच जास्त बनाल. एखाद्या गोष्टीची काळजी जास्त कराल अशा वेळी उत्साह आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


आज भरपूर कष्ट कराल आणि सर्व कामे पार पाडाल. महिला खूप विचार करतील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


बरेच दिवसांपासून एखादे काम डोक्यात असेल त्या कामाची सुरुवात करायला आजचा दिवस चांगला आहे. 


कन्या रास  (Virgo Horoscope Today)


एखाद्या मध्यस्था तर्फे तुमचे काम होईल. टेलिफोन कॉम्प्युटर ट्रॅव्हल एजन्सी या संदर्भातील कामांना वेग येईल. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


संततीच्या संदर्भातील चांगल्या बातम्या कानावर येतील. गरोदर स्त्रियांनी काळजी घ्यावी. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आपली कला चांगल्यापैकी इतरांसमोर दाखवता येईल. तेथे वेगवेगळ्या संधी मिळतील. 


धनु रास  (Sagittarius Horoscope Today)


परदेशासंबंधातील कामांमध्ये अडचणी येतील. शेजाऱ्यांशी मतभेद संभव संभवतात.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


महिला घरातील मंगल कार्यात भाग घेतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 


कुंभ रास  (Aquarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात सर्व गुप्त गोष्टी इतरांसमोर न बोलणे चांगले. काही गोष्टी स्वतःजवळ राखून ठेवा. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


नवीन कामाची सुरुवात करताना त्याबाबतीत तपशीलवार माहिती घ्यावी लागेल.  त्यानुसार कामाची आखणी करा.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Scorpio Weekly Horoscope 01 July To 07 July 2024 : नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा उत्तम, फक्त 'ही' गोष्ट टाळा; वाचा वृश्चिक राशीचं साप्ताहिक राशीभविष्य