Horoscope Today 01 January 2025 : पंचांगानुसार, आज 01 जानेवारी 2025. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज पैसे मिळाले तरी त्याच्या खर्चाला अनेक वाटा फुटल्यामुळे थोडी चिडचिड होईल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


घरापासून दूर राहण्याचे योग येतील त्यामुळे घरातील लोक नाराज होतील. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


तुमच्या लहरी स्वभावामुळे जवळच्या माणसांना थोडा त्रास होईल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कोणत्याही निर्णय पटकन घेणार नाही त्यामुळे तुमच्या धडाडीला अविचाराचे स्वरूप येऊ शकते.


सिंह रास (Leo Horoscope Today)


काटेकोर जीवनाचा कंटाळा येईल महिलांची प्रत्येक गोष्टीत आनंद घेण्याची प्रवृत्ती राहील. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


घरातील नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


आज कामाचा थोडासा ताण येईल आर्थिक बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


आज कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्या. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


कर्जबाजारी असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


प्रियजनांशी शिल्लक कारणावरून तात्पुरता दुरावा निर्माण होईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


व्यापार धंद्यात महत्त्वाचे सौदे झाले तरी त्यातील संभाव्य धोक्यांचा बारकाईने अभ्यास करा. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


कोणत्याही कागदपत्रांवर पटकन सह्या करू नयेत महिला त्यांचे छंद जोपासतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Yearly Numerology : 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष 2025? जाणून घ्या भविष्य