Horoscope Today 01 August 2024 : पंचांगानुसार, आज 01 ऑगस्ट 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज देखल्या देवा दंडवत करून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत. कोणाच्याही अध्यात मध्यात पडू नका. 


 वृषभ रास (Taurus Horoscope Today)


बुद्धी आणि व्यासंगाच्या जोरावर बरीच कामे पार पडाल फक्त बोलण्यात निश्चितपणा व ठामपणा ठेवायला हवा. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


परिस्थितीचे योग्य आकलन करून घ्यावे लागेल. आर्थिक घडी सुधारली तरी निष्काळजीपणा आणि खर्चिक वृत्तीमुळे हातात काही शिल्लक राहणार नाही.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पना ठेवल्यामुळे नुकसान करून घ्याल. तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे त्याची काळजी घ्या. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


आहार विहारात नियमितपणा न ठेवल्यास स्वास्थ बिघडेल. महिलांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे. प्रवासाचे बेत आखाल. प्रवासात काळजी घ्या. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. लवकरच शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आर्थिक चणचण  भासणार नाही. ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल. नोकरीमध्ये तुमच्या कामांना महत्त्व  मिळेल


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


आज ज्यांच्यावर तुमची मर्जी असेल त्यांना खूप सहकार्य कराल. नवीन कल्पनांचे जनक बनाल. व्यवसायात चांगली मदत होईल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


काम पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान कराल. विचार आणि बुद्धीचा वापर तुमच्या हातून जास्त होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Shrawan Mass 2024 : 'या' दिवसापासून श्रावण मासारंभाला सुरुवात; मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमेसह जाणून घ्या महत्त्वाच्या दिवसांची यादी