Death signs : जीवनातील सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू. कोणीही मृत्यूला टाळू शकत नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित असतो. प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूची वेळ ठरलेली असते. पण अकाली मृत्यू ही ईश्वराची शिक्षा मानली जाते. प्रत्यक्ष मृत्यूची वेळ येईपर्यंत तो शरीराशिवाय भटकत राहतो असे म्हणतात. मृत्यू केव्हा येईल आणि त्याला कोण घेऊन जाईल हे कोणालाच माहीत नाही. पण ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्याच्या मृत्यूपूर्वी अनेक प्रकारचे संकेत मिळतात.
मृत्यूचे संकेत
- शिवपुराणात सांगितले आहे की, मृत्यूच्या काही महिने आधी माणसाची जीभ नीट काम करणे बंद करते, त्याला जेवणाची योग्य चव मिळत नाही. शिवाय बोलण्यातही त्रास होतो.
- एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश पाहण्यास असमर्थता जाणवू लागते, तेव्हा हा संकेत आहे की आयुष्यातील काही वेळ शिल्लक आहे. असे म्हटले जाते की मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्ती चंद्र आणि सूर्य सामान्यपणे पाहू शकत नाही.
- शिवपुराणातील भगवान शंकरानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा होऊ लागतो त्यावेळी हे सूचित करते की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
- तुम्हाला तुमची सावली दिसत नसेल तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीला धड नसलेली सावली दिसू लागते, तेव्हा त्या व्यक्तीचा लवकरच मृत्यू होतो.
- ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला तोंड, जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे जाणवू लागते, तर ते व्यक्तीच्या लवकर मृत्यूचे लक्षण मानले जाते
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :