Astro Tips For Handkerchief : अनेकांना आपल्याजवळ रुमाल (Handkerchief) बाळगण्याची सवय असते. नेहमी आपल्यासोबत असणारा रुमाल तुमच्यावर कमी अधिक प्रमाणात चांगला-वाईट प्रभाव टाकत असतो. जर रुमालाशी संबंधित काही गोष्टी पाळल्या नाहीत तर त्या नुकसानकारक ठरु शकतात.  रुमाल (Astro Trips For Rumal) खरेदी करताना आपण कधीच विचार करत नाही. परंतु तुमच्या खिशात असणारे रुमालाचे धागे हे तुमच्या नशीबाशी जोडले गेले आहेत, असे म्हटले तर तुम्हाला नवल वाटेल. पण  रुमालाशी संबंधित (Astro Tips) या गोष्टी जरुर लक्षात ठेवाव्यात.


ज्योतिष शास्त्रानुसार काही रंग हे काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी वर्ज्य मानले जातात. जसे रंग महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपल्या रोज वापरात येणाऱ्या रुमालाचे देखील ज्योतिष शास्त्रात महत्त्व सांगितले आहे. लहानपणापासून आपण वापरत असलेला रूमाल हा नशिबाशी जोडलेला आहे. रुमालामुळे आपलं नशीब उजळवण्यास मदत करणार आहे. फक्त तुम्हाला रुमाल वापरताना रंगांची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणत्या रंगाचा रुमाल हा कोणत्या राशीसाठी खास आहे हे आपण जाणून घेऊया. 


मेष (Aries)


मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीसाठी लाल, पिवळा आणि गुलाबी रंग हा शुभ मानला जातो. या रंगाचा रुमाल वापरल्यानंतर तुमचे नशीब उजळेल


वृषभ (Taurus)


वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या लोकांनी पांढरा, हिरवा आणि करडया रंगाचा रुमाल वापरणे फलदायी आहे. जर यापैकी कोणताही रुमाल तुम्ही तुमच्या खिशात किंवा बॅगमध्ये ठेवल्यात तुमचे नशीब उजळेल


मिथुन  (Gemini)


मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. हिरवा, नीळा, जांभळा रंग हा मिथुन राशीसाठी शुभ आहे. हा रुमाल जवळ ठेवल्याने तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल.


कर्क (Cancer)


कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांसाठी पांढरा, गुलाबी, क्रीम रंगाचा रुमाल वापरणे अतिशय लाभदायक असणार आहे. हा रंग वापरल्याने समाजातील तुमचा मानसन्मान वाढेल


सिंह (Leo)


सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. जर तुम्ही  लाल रंगाबरोबबर पिवळा आणि गुलाबी रंगाचा  रुमाल वापरल्यास त्याचा चांगला परिणाम होईल. हा रुमाल वापरल्याने तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील


कन्या (Virgo) 


कन्या राशीचा स्वामी कन्या ग्रह आहे. कन्या राशींसाठी हिरवा, निळा, जांभळा आणि पिवळा रंग वापरावा. या रंगामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल. 


तुळ (Libra) 


तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. जर तुळ राशीच्या लोकांना पांढऱ्या रंगासोबत गुलाबी रंगाचा रुमाल जवळ ठेवला तर तुम्हाला धनलाभ निश्चित आहे. धनलाभाबरोबच तुमच्या करिअरचा आलेख उंचावत जाईल


वृश्चिक ( Scorpio)


वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्य लोकांसाठी लाल, गुलाबी, पांढरा आणि करड्या रंगाचा रुमाल वापरणे अतिशय फलदायी ठरणार आहे.


धनु  (Sagittarius) 


धनु राशीचा स्वामी बृहस्पकी आहे. जर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर पिवळा, लाल, गुलाबी रंगाचा रुमाल वापरणे अतिशय फलदायी ठरणार आहे. 


मकर (Capricorn)


शनि मकर राशीचा स्वामी आहे.मकर राशीसाठी नीळा, काळा, जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. हा रंग वापरल्यास तुमच्या करिअरचा आलेख आणखी उंचावेल


कुंभ  (Aquarius) 


कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. काळा आणि हिरवा रंग शुभ असून या रंगामुळे भरभराट होईल


मीन (Pisces) 


मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. जर पिवळा, करडा , लाल आणि पांढरा रंग तुम्ही वापरला तर सकारात्मक ऊर्जा मिळेल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Astro Tips : बेडवर बसून जेवल्याने लक्ष्मी होते नाराज; होतात 'हे' वाईट परिणाम