Holi Remedies : होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं, यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी आहे. असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो. होलिका दहन (Holi 2024) केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो, जीवनात सकारात्मकता येते, सुख-समृद्धी येते, अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे. 


होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी, यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो. ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता. आर्थिक संकट दूर करू शकता. 


धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एकच छोटं काम करायचं आहे. होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे (Holi Remedies) तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात, तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात, त्याच बरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते.


होळीच्या दिवशी करा 'हा' मुख्य उपाय


होळीच्या दिवशी सकाळी 10 वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं. त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे, त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं, पिंपळाला पाणी घालावं. यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्रोताचं पठण करावं. मग ते श्री सुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल, त्याचं पठण करावं, यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. 


आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय


आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा. याच सोबत त्या राखेची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा, यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. 


घरात सुख-शांति येण्यासाठी उपाय


घरात सुख-शांति आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका, यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख-शांति येते. 


घरावरील वाईट दृष्टी दूर करण्यासाठी उपाय


जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा, त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Holi 2024 : होळीच्या दिवशी केवळ चंद्रग्रहणच नाही, तर राहू-सूर्यामुळे देखील होणार त्रास; कुंभसह 'या' 3 राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, धनहानीचे संकेत