Holi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका (Holika) दहन केलं जातं. तर, दुसऱ्या दिवशी रंगाची होळी (Holi 2025) खेळली जाते. यावर्षी 13 मार्च रोजी होलिका दहन होणार आहे. तर, 14 मार्च रोजी होळी खेळली जाणार आहे. मात्र, यंदाची होळी काहीशी वेगळी असणार आहे. कारण याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. इतकंच नव्हे तर, ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आणि सूर्य ग्रहणाचा दुर्लभ संयोग अनेक दशकांनंतर आला आहे.
शास्त्रानुसार, चंद्रग्रहण 14 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांपासून सुरु होणार आहे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात त्याचा सूतक काळ नसेल. मात्र, याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्र ग्रहणाच्या दिवशी सूर्याच्या संक्रमणाचा शुभ योग असणार आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरमधील सर्व चिंता दूर होतील. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. सर्व अडचणी दूर होतील. तसेच, आर्थिक लाभ देखील मिळणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी होळीनंतरचा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुमची दिर्घकालीन आजारांपासून सुटका होईल. तसेच, शारिरीक स्वास्थ्याबरोबरच मानसिक शांती देखील मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. तुम्हाला कोणाकडेही पैसे मागावे लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा दुर्लभ योग फार फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आरोग्यात देखील चांगली सुधारणा पाहायला मिळे. मित्र-परिवारांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या आयुष्यात 14 मार्चपासून सुवर्णकाळ सुरु होणार आहे. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तसेच, अप्रत्यक्षपणे तुम्हाला धनलाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल. चांगला धनलाभ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: