Chhaava Box Office Collection Day 19: विक्की कौशल (Vicky Kaushal) सध्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं 450 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. सध्या 'छावा' 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे. 19 व्या दिवशीही चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. अशातच चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
19व्या दिवशी 'छावा'चं कलेक्शन किती?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 19 व्या दिवशी (तिसरा मंगळवार) रात्री 9 वाजेपर्यंत 'छावा'नं 4.72 कोटी रुपये कमावले आहेत. छावाला 6-8 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 471.72 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. जर चित्रपटानं 6-8 कोटींची कमाई केली, तर तो 2025 च्या तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल.
'छावा' चित्रपटानं पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले होते. 'छावा'नं सुरुवातीपासूनच खळबळ उडवून दिली. यानंतर, चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 48 कोटींची कमाई करून खळबळ उडवून दिली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 219.25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 180.25 कोटी रुपये कमावले.
पंधराव्या दिवशी 'छावा'नं 13 कोटी रुपये कमावले आहेत. त्यानंतर 16 व्या दिवशीही 22 कोटी रुपयांच्या कलेक्शननं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर, 17 व्या दिवशी 'छावा'नं 24.25 कोटी रुपये आणि 18 व्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमावले.
दरम्यान, 'छावा'मध्ये विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानानं महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अक्षय खन्नानं औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. विनीत सिंह, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :