Holi 2023 : होळी हा रंगांचा तसेच प्रेमाचा सण आहे. प्रत्येकजण होळीची आतुरतेने वाट पाहत असतो, जर तुमचे लग्न नुकतेच झाले असेल आणि लग्नानंतरची येणारी ही पहिली होळी असेल, तर नवविवाहित जोडप्याने काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार, लग्नानंतर पहिल्यांदा होळीच्या दिवशी काय केले पाहिजे? जेणेकरून पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहावे. जाणून घ्या काही खास उपाय



नवविवाहित जोडप्यांसाठी पहिली होळी खास!
ज्योतिषशास्त्रानुसार, होलिका दहनाच्या दिवशी नवविवाहित जोडप्यांनी घरातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. लग्नानंतर ज्यांची पहिली होळी असेल, अशा नवविवाहित पती-पत्नीने मिळून होलिकेची पूजा करावी, पण लक्षात ठेवा, होलिका दहन करण्यापूर्वी नवविवाहित जोडप्याने होलिकेच्या अग्निला भेट देऊ नये किंवा प्रदक्षिणा करू नये.



होलिका दहनाच्या दिवशी करा हे उपाय
होलिका दहनाच्या दिवशी सर्व देवी-देवतांना गुलाल अर्पण करतात. पती-पत्नी एकमेकांना गुलाल लावतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत जावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.



होळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा
संध्याकाळी पती-पत्नी मिळून देवी लक्ष्मीची लाल दिवा आणि कापूर लावून आरती करतात आणि देवी लक्ष्मीला खीर देतात. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी तर वाढतेच पण वैवाहिक जीवनात प्रेम आणि संबंध चांगले होतात.


 


होलिका दहन आणि रंगपंचमी कधी?
हिंदू धर्मात होळी हा सण उत्सासाहात साजरा केला जातो.  यंदा होलिका दहन सण 6 मार्च 2023  रोजी आहे. तर होलिका दहनानंतर धुलिवंदन असते. धुलिवंदनाला एकमेकांना रंग लावून धुलिवंदन साजरा केला जातो. 7 मार्चला रंगांची उधळण केली जाणार आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात होळीच्या पाच दिवसांनंतर रंगपंचमी खेळली जाते, यंदा रंगपंचमी 12 मार्चला आहे. या दिवशी लोक सर्व राग-रुसवा विसरून एकमेकांना रंग लावतात. रंगांचा हा सण आयुष्यात अनेक आनंद घेऊन येतो.



होळीच्या दिवशी उघड्या केसांनी बाहेर पडू नका


ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी ग्रहांची स्थिती उग्र राहते आणि नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते, त्यामुळे नवविवाहित मुलींनी उघड्या आणि ओल्या केसांनी चौकाचौकात फिरू नये.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Holi 2023: होळीला 4 राशीच्या लोकांनी सावध राहा, शनिसोबत या ग्रहांची हालचाल वाढवणार डोकेदुखी, 'हे' उपाय करा