Share Market Opening Bell : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्ससह निफ्टीची चांगली घोडदौड सुरु आहे. सेन्सेक्स 400 अंकांना वधारला आहे. तसेच निफ्टीही वाढून 17400 अंकांच्या पुढे गेला आहे. सेन्सेक्स सध्या 495.23 अंकांनी वाढून 59,404.58 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने 156.25 अंकांनी उसळी घेतली असून 17448.23 वर ट्रेड करत आहे.


Share Market Opening : सेन्सेक्सची 500 तर निफ्टी 150 अंकांनी उसळी


आज भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात तेजीत व्यवहार सुरु झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 500 अंकांपर्यंत उसळी घेतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 500 अंकांच्या वाढीसह तर, निफ्टी 150 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. या दरम्यान अदानी समुहाच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे. एसबीआयचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.


Share Market Updates : शेअर बाजारातील परिस्थिती काय?


आज सुरुवातीच्या सत्रात अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) आणि एशियन पेंट्स (Asian Paints) व्यतिरिक्त 28 शेअर्स तेजीत होते. एसबीआयचे (SBI) शेअर्स सर्वाधिक 3.31 टक्के तेजीत व्यवहार करत होते. पॉवर ग्रिड (Powergrid Corporation) आणि इंडसइंड बँक (Indusind Bank) शेअर्समध्येही प्रत्येकी दोन टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. एनटीपीसी (NTPC), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), भारती एअरटेल (Bharti Airtel), आयटीसी (ITC), एचसीएल टेक (HCL Tech), एल अँड टी (L&T), टाटा स्टील (Tata Steel), महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) शेअर्समध्येही प्रत्येकी एक टक्क्यांची वाढ झाली आहे.


Share Market Opening : प्री- ओपनिंगमध्येही चांगले संकेत


BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही प्रो-ओपनिंगपासून मजबूत स्थितीत होते. सिंगापूरमध्ये, NSE निफ्टी SGX निफ्टी (SGX निफ्टी) चे फ्युचर्स 1.50 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत होते. यावरुनच आज देशांतर्गत शेअर बाजारात चांगला व्यवसाय होण्याची अंदाज वर्तवण्यात आला होता. शेअर बाजारात व्यवहार सुरु झाला तेव्हा बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांच्या वाढीसह 59,400 अंकांच्या जवळ पोहोचला. त्याचप्रमाणे NSE निफ्टीने सुमारे 115 अंकांच्या वाढीसह 17,475 चा टप्पा ओलांडला.


'हे' शेअर्स तेजीत


अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, अंबुजा सिमेंट हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.


'हे' शेअर्स घसरले?


एशियन पेंट्स, गुजरात गॅस, IEX, अल्ट्राटेक सिंमेट, श्री सिंमेट हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LPG Price Hike: होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका... LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला