Dhulivandan Wishes in Marathi : दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करुन धुळवड साजरी केली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली जाते. हल्ली धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमीसारखा रंगोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण देशात हा उत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. तुम्ही या धुळवडीला घरबसल्या तुमच्या मित्र-परिवाराला होळीच्या रंगमयी शुभेच्छापर संदेश पाठवू शकता.


आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरक शुभेच्छा संदेश (Dhulivandan 2024 Wishes in Marathi) सुचवणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. तुम्ही धुलिवंदनानिमित्त खालील शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर देखील पोस्ट करू शकता किंवा स्टेटस म्हणून ठेवू शकता.


धुलिवंदन शुभेच्छा संदेश (Dhulivandan Wishes In Marathi)


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमयी शुभेच्छा!


रंग साठले मनी अंतरी 
उधळू त्यांना नभी चला 
आला आला रंगोत्सव हा आला…
तुम्हाला धुलिवंदनाच्या रंगीत शुभेच्छा!


प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा!


लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले, एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया रंगपंचमीच्या नशेत विलक्षण
धुळवडीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!


नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा!


होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
धुलिवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!


धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ,
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू,
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धुलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा:


Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या