Guru Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा गुरू (Guru Vakri 2024) बृहस्पति नवरात्रीच्या दरम्यान उलट फिरणार आहे. 9 ऑक्टोबरला गुरू वृषभ राशीत वक्री होईल. पुढील वर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत तो याच स्थितीत राहील. गुरूच्या वक्री स्थितीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होईल, परंतु 3 राशी अशा आहेत, ज्यांचं नशीब या काळात उजळू शकतं. या राशीच्या लोकांना नवीन नोकरीसह अचानक धनलाभ होऊ शकतो, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


गुरूची उलटी चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या नोकरीतही तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. तसेच, या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची उलटी चाल शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. सुख-समृद्धीत वाढ होईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती बळकट दिसेल. व्यावसायिकांना नवीन डील मिळू शकते, त्यांचे जास्तीत जास्त उत्पादन विकले जाईल.


धनु रास (Sagittarius)


गुरूची वक्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकतं. धनु राशीचे लोक या काळात नवीन मालमत्ता खरेदी करू शकतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतील. या काळात तुमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी काळ प्रगतीचा आहे. या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल.


मिथुन रास (Gemini)


गुरूची उलटी चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच या काळात तुमच्या नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही या काळात परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमचं रखडलेलं कामही या काळात पूर्ण होईल. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाच्या चालीत बदल; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ