Guru Margi 2025 : बृहस्पति दरवर्षी आपली राशी बदलतो. संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला 12 वर्षं लागतात. या व्यतिरिक्त बृहस्पति, म्हणजेच गुरू मधेमधे आपली चाल देखील बदलतो, ज्याचा परिणाम सर्व राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. वैदिक कॅलेंडरनुसार, गुरु सध्या वृषभ राशीमध्ये वक्री स्थितीत आहे. पण तो 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03:09 वाजता वृषभ राशीत सरळ चालीत मार्गी होईल. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कर्क रास (Cancer)


या राशीच्या लोकांसाठी गुरुची सरळ चाल खूप फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित लाभ होणार आहेत. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच तुम्ही नोकरीतही यश मिळवू शकता. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. व्यवसायातही नफा होणार आहे, विशेषत: सट्टेबाजी आणि व्यापाराशी संबंधित व्यवसायात भरपूर नफा होऊ शकतो. भरीव रक्कम मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आर्थिक स्थिती मजबूत राहील. यामुळे तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं गोड होणार आहे.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी गुरूच्या चालीतील बदल शुभ परिणाम देणारा ठरेल. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येतील. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. आयुष्यातील प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. कुंडलीतील नशिबाच्या घरात बृहस्पति असल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळू शकतं आणि मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहील.


धनु रास (Sagittarius)


या राशीच्या लोकांसाठी गुरूची सरळ हालचाल फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांचं उत्पन्न अनपेक्षितरित्या वाढू शकतं. यासोबतच तुम्हाला कर्जाच्या माध्यमातून बरेच फायदे मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुमचं काम पाहून एखादा उच्च अधिकारी तुम्हाला मोठं पद देऊ शकतो. यासोबतच तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही लाभ मिळू शकतो. जीवनात आनंदात झपाट्याने वाढ होऊ शकते. यासोबतच लव्ह लाईफबाबत थोडं संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा समस्या वाढू शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Makar Sankranti 2025 : यंदाची मकर संक्रांत 3 राशींसाठी ठरणार खास; 14 जानेवारीपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले