Guru Gochar 2025 : बृहस्पति, देवांचा गुरू (Jupiter) नवग्रहांमध्ये विशेष मानला जातो. बृहस्पति, म्हणजेच गुरू ग्रह एका वर्षाने आपली राशी बदलतो. पण जर 2025 बद्दल बोलायचं झालं, तर तो 3 पट वेगाने पुढे जाईल, ज्याला गुरु अतिचारी म्हणतात. अशा स्थितीत गुरू या वर्षात तीनदा राशी बदलेल. याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होईल.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 14 मे 2025 रोजी गुरु प्रथम मिथुन राशीत प्रवेश करेल. यानंतर, 18 ऑक्टोबर 2025 रोजी तो त्याच्या उच्च राशी, कर्क राशीत जाईल आणि वर्षाच्या शेवटी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी, तो पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरूच्या स्थितीतील हा बदल 3 राशींना सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
गुरुच्या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न होईल किंवा एखाद्याला मूल होईल. कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर त्यात यश मिळू शकतं. बृहस्पतिची स्थिती आठव्या भावात पडल्यास वडिलोपार्जित संपत्ती किंवा एखाद्याला दिलेला पैसा परत मिळू शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. परदेशातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना देखील या काळात खूप फायदा होतो. जमीन आणि घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात भरघोस नफा मिळेल. गुरुच्या स्थितीमुळे तुम्ही अनेक प्रवास कराल. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुमची निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. ऑक्टोबरमध्ये जेव्हा गुरु कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा तो आठव्या भावात असेल. अशा स्थितीत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. पण आरोग्याबाबत थोडे सावध राहा.
कुंभ रास (Aquarius)
नवीन वर्षात गुरुच्या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांना खूप आर्थिक लाभ होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक खूप यश मिळवू शकतात. याशिवाय तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकतं. अशा स्थितीत तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. मुलांची प्रगती होईल. यासोबतच ऑक्टोबरमध्ये गुरु कर्क राशीत प्रवेश करून सहाव्या भावात राहणार आहे. अशा स्थितीत आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे थोडं सावध राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: